माध्यमिक शिक्षक पतपेढीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:10 IST2020-05-06T19:09:49+5:302020-05-06T19:10:00+5:30
जळगाव : राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीसाठी शहरातील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्यावतीने ११ लाख ११ हजार १११ रुपयांची मदत ...

माध्यमिक शिक्षक पतपेढीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाखाची मदत
जळगाव : राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीसाठी शहरातील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्यावतीने ११ लाख ११ हजार १११ रुपयांची मदत जाहीर केली. मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तो धनादेश सुपूर्द करण्यात आला.
कोरोना विषाणू विरूध्दच्या लढाईत प्रत्येकाने आपल्या आर्थिक कुवतीनुसार कोरोनाग्रस्तांसाठी जमेल तशी मदत करून खारीचा वाटा उचलावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते़ या आवाहनाला प्रतिसाद देत माध्यमिक शिक्षक पतपेढी आर्थिक मदत जाहीर केली़ पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरुड यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे़
यांची होती उपस्थिती
यावेळी माध्यमिक शिक्षक पतपेढीचे मानद सचिव मनोहर सूर्यवंशी, उपाध्यक्ष बी.टी. सपकाळे, संचालक हेमंत चौधरी, नंदकुमार पाटील, संजय निकम , अधिक्षक आर.एन.महाजन आदी उपस्थित होते.