शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला सोडून परतणाऱ्या विद्यार्थिनीला स्कूल बसने उडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 12:37 IST

स्कूलच्या बसने दुचाकीवरून जाणा-या पलक अनिल कोरानी (१६, रा.आदर्श नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला उडविल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता डीमार्टनजीक असलेल्या मोहाडी फाट्याजवळ घडली.

जळगाव : शाळेत जाणा-या बहिणीला थांब्यावर सोडून माघारी फिरताच भरधाव वेगाने आलेल्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या बसने दुचाकीवरून जाणा-या पलक अनिल कोरानी (१६, रा.आदर्श नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला उडविल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता डीमार्टनजीक असलेल्या मोहाडी फाट्याजवळ घडली. या अपघातात पलक गंभीर जखमी झाली असून, तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पलक कोरानी ही शिरसोली रस्त्यावरील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर लहान बहीण आर्ची आठवीला याच शाळेत शिक्षण घेत आहे. आर्ची ही मोहाडी रस्त्याजवळील थांब्यावरुन शाळेच्या बसने जाते. त्यासाठी पलक ही दुचाकीने (एमएच-१९ सीएम/६६६०) आर्चीला सोडण्यासाठी आली होती. थांब्यावर तिला सोडून बसमध्ये बसविले, त्यानंतर लगेच माघारी फिरली असता डी मार्टकडून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या शाळेच्याच स्कूल बसने (एमएच-१९ वाय/६२०१) दुचाकीला उडविले. त्यात पलक ही दुचाकीसह बसच्या पुढच्या चाकाखाली आली.पलक हिला डोक्याला व कानाजवळ मार लागला आहे. दुस-या दवाखान्यातून तातडीने सिटी स्कॅन करण्यात आले. प्रकृती गंभीर असली तरी धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नशीब बलवत्तर म्हणून पलक या अपघातातून बचावली आहे. दरम्यान, दहा वाजता पोलिसांनी घटनास्थळावरून बस व दुचाकी ताब्यात घेतली.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव