शालेय पोषण आहार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:47 IST2018-08-20T22:47:24+5:302018-08-20T22:47:43+5:30

अमळनेर तालुक्यातील डांगर येथील घटना

School Nutrition Lampas | शालेय पोषण आहार लंपास

शालेय पोषण आहार लंपास


अमळनेर : तालुक्यातील डांगर येथील योगेश्वर माध्यमिक विद्यालयातून अज्ञात चोरट्याने शालेय पोषण आहाराचे धान्य लंपास केल्याची घटना १८ रोजी दुपारपासून तर २० रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान घडली.
डांगर येथील योगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा खोलीतून अज्ञात चोरट्याने खोलीचे कुलूप तोडून ५० किलो वजनाच्या २८ गोण्या तांदूळ आणि १७ किलो मठ असा एकूण २१ हजार ८५० रुपयांचा शालेय पोषण आहार चोरी झाला आहे. याबाबत मुख्याध्यापक नानाजी संतोष भामरे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४५७ व ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: School Nutrition Lampas