संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : शेतमजुरी, गवंडी काम, केरसुण्या बनविणे, डफवादन व दवंडी यातून कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या मातंग समाजाने खेडगावात यावर्षी लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयंतीच्या दिवशी मिरवणूक न काढता डीजेवर होणाºया खर्चातून मराठी शाळेतील मुलांना वह्या व पेनचे वाटप केले. या विधायक उपक्रमाचे कौतुक होत आहे.कार्यक्रमात सुरवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यानंतर माजी सरपंच प्रकाश पाटील, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष मनोहर महाले, युवराज हिरे, सुनील माळी, मुख्याध्यापक सहादू सरदार, शिक्षक सोपान मोरे, नीलेश साळुंखे, रमेश पाटील, लता महाले, राजश्री वाघ व क्रांतिकारी लहू मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते १४७ मुलांना हे शालेय साहित्य वाटप झाले. लोकवर्गणी न जमा करता, मजुरीतून आलेल्या पैशातून हे शालेय साहित्य घेण्यात आले. वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.कार्यक्रम यशस्वितेसाठी गोपाल नेटारे, दिलीप नेटारे, अशोक नेटारे, सागर नेटारे, अमोल नेटारे, आकाश नेटारे, भाऊसाहेब नेटारे, सोमनाथ नेटारे, सचिन केंदाळे, गणेश नेटारे, मानाजी नेटारे, रवी आंभोरे, विजय नेटारे, शंकर नेटारे, वसंत नेटारे व समाजबांधवांनी सहकार्य केले.
भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे डीजे मिरवणूक टाळत शालेय दातृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:11 IST
शेतमजुरी, गवंडी काम, केरसुण्या बनविणे, डफवादन व दवंडी यातून कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या मातंग समाजाने खेडगावात यावर्षी लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयंतीच्या दिवशी मिरवणूक न काढता डीजेवर होणाºया खर्चातून मराठी शाळेतील मुलांना वह्या व पेनचे वाटप केले.
भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे डीजे मिरवणूक टाळत शालेय दातृत्व
ठळक मुद्देचांगभलं, चांगभलंअण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षात मातंग समाजाचा विधायक उपक्रम