पारोळा येथे ८६७ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:12+5:302021-08-13T04:21:12+5:30
१२ रोजी पारोळा तालुक्यातील ८ केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून इ.५ वी व ८ वी ची शिष्यवृत्ती ...

पारोळा येथे ८६७ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा
१२ रोजी पारोळा तालुक्यातील ८ केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून इ.५ वी व ८ वी ची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. ग्रामीण भागातून बहादरपूर,भिलाली, व तामसवाडी या तीन केंद्रांवर तर शहरी भागातून एन.ई.एस. हायस्कूल, बालाजी हायस्कूल, स्वामी समर्थ हायस्कूल या पाच केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. इ.५ वी साठी एकूण चार केंद्रांवर ६४१ प्रविष्ट विद्यार्थीपैकी ५४१ विद्यार्थी उपस्थित होते तर इतर ८ वी साठी चार केंद्रावर एकूण ३५५ प्रविष्ट विद्यार्थीपैकी ३२६ विद्यार्थी उपस्थित होते.
या परीक्षेसाठी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. तसेच आरोग्य विभागाकडून सर्व केंद्रावर आरोग्य पथके पाठवण्यात आली होती. पोलीस विभागाने पोलीस बंदोबस्तही दिला होता. सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. जिल्हास्तरावर शालेय पोषण आहार अधीक्षक प्रीती पवार यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तालुकास्तरावरून गटसाधन केंद्रातील सर्व मोबाइल टिचर्स, साधन व्यक्ती, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, विस्तार अधिकारी सी. एम. चौधरी, केंद्रप्रमुख गोविंद मिस्त्री यांनी भेटी दिल्या.