शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
2
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
5
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
6
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
7
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
8
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
9
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
10
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
11
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
12
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
13
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
14
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
15
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
16
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
17
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
18
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
19
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
20
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली

दुतोंडीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:29 IST

मिलिंद कुलकर्णीसामान्य नागरिकांचे जीवन उन्नत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करीत कल्याणकारी राज्य करण्याची भाषा एकीकडे करायची आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरविणाऱ्या पालिकांची आर्थिक कोंडी करण्याची एकही संधी दवडायची नाही, असा दुतोंडीपणा सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करीत आहे. पक्षीय राजकारणातून असे प्रकार घडत असल्याचे स्वच्छ आणि स्पष्ट चित्र ...

मिलिंद कुलकर्णीसामान्य नागरिकांचे जीवन उन्नत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करीत कल्याणकारी राज्य करण्याची भाषा एकीकडे करायची आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरविणाऱ्या पालिकांची आर्थिक कोंडी करण्याची एकही संधी दवडायची नाही, असा दुतोंडीपणा सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करीत आहे. पक्षीय राजकारणातून असे प्रकार घडत असल्याचे स्वच्छ आणि स्पष्ट चित्र असल्याने सत्ताधारी पक्ष भाजपा आणि राज्य सरकारचा हेतू दूषित असण्याविषयी शिक्कामोर्तब होत आहे. जळगाव महापालिका आर्थिक संकटात आहे. घरकुलांसाठी हुडकोकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि २०१२ मध्ये महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलांची मुदत संपूनही गाळेकराराचे नुतनीकरण व भाडे वसुली प्रलंबित असणे ही आर्थिक संकटाची दोन प्रमुख कारणे आहेत. हुडकोकडून घेतलेल्या कर्जाची २००१ पर्यंत नियमितपणे परतफेड सुरु होती. परंतु भाजपाच्याच लोकनियुक्त नगराध्यक्षांनी सत्तेवर आल्यानंतर कर्जहप्ते भरणे बंद केल्याने कर्जाचे नियमित चक्र बिघडले. मुद्दलापेक्षा अधिक कर्जफेड करुनही महापालिकेवर कर्जाचा बोजा कायम आहे. न्यायालय, लवाद या पातळीवर कैफीयत मांडली गेली आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाची या कर्जाला हमी आहे. दुसºया विषयात गाळेधारकांच्या कराराची मुदत संपल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीने १९ डिसेंबर २०१३ रोजी गाळेधारक व महापालिकेच्या हिताचा ठराव केला. परंतु भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी गाळेधारकांचा कळवळा दाखवत या ठरावाला राज्य शासनाकडून स्थगिती आणली. सुमारे साडेचार वर्षे गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. हजार गाळेधारक साडेपाच लाख नागरिकांना वेठीस धरत आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने लिलाव करण्याचे सुस्पष्ट निर्देश दिले. खंडपीठाच्या निकालानंतर नऊ महिन्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची अंमलबजाणी केलेली नाही. या दोन्ही घटनांमधून राज्य सरकारची पक्षपाती भूमिका दिसून येते. पक्षीय राजकारणाला सत्ताधारी भाजपा कसे प्रोत्साहन देत आहे, त्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे. याच जळगावकरांनी लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये भाजपाच्या उमेदवाराला ८० हजारांचे मताधिक्य दिले; विधानसभा निवडणुकीत ४० हजारांचे मताधिक्य दिले. तरीही जळगावकरांच्या नशिबी हे भोग आहेत, याचे कारण असे की, भाजपाला आता महापालिकेवर झेंडा फडकवायचा आहे. गेल्या सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गाळेधारकांच्या शिष्टमंडळाला सांगतात की, तुमचा प्रश्न सोडविण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेत आहोत. तुम्ही निर्धास्त रहा, सरकार तुमच्यासोबत आहे. या आश्वासनाच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास विभागाचे उपसचिव महापालिकेला पत्र पाठवून कळवितात की, गाळ्यांविषयीच्या ठरावावरील स्थगिती राज्य शासनाने १८ डिसेंबर २०१७ रोजी उठविली आहे. सध्या याविषयी कोणतीही बाब शासनाकडे प्रलंबित नाही. खंडपीठाच्या निकालानुसार आता महापालिकेने कार्यवाही करणे अभिप्रेत आहे. दुतोंडीपणाला आणखी वेगळे काय परिमाण असायला हवे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव