करगाव आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 15:11 IST2021-01-03T15:11:30+5:302021-01-03T15:11:43+5:30

करगाव आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

Savitribai Phule Jayanti celebration at Kargaon Ashram School | करगाव आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

करगाव आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चाळीसगाव : जगन राठोड प्राथमिक आश्रमशाळा आणि जी.जी.चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा करगाव येथे सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिवस साजरा झाला.  अध्यक्षस्थानी प्राथमिक विभाग मुख्याध्यापक डी.व्ही.पाटील  होते. माध्यमिक विभाग मुख्याध्यापक विजय रामदास बोरसे यांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. शिक्षक बाळकृष्ण मालपुरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय दिला. पर्यवेक्षक मनोहर आंधळे, ज्येष्ठ शिक्षक बी.एस.शेख, सुरेंद्र पाटील, निवृत्ती वाडे, ब्रिजलाल जाधव, डी.डी.महाजन, पी.एस.पाटील, दिलीप बाविस्कर, एस.के.राठोड व सुकलाल जाधव यांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Savitribai Phule Jayanti celebration at Kargaon Ashram School