शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

कारला वाचविण्यासाठी लावला अर्जंट ब्रेक, ट्रालीचे हुक तुटून ट्रॅक्टर उलटल्याने चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:33 PM

महामार्गावर अपघातांची मालिका

जळगाव : चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने समोरून भरधाव ओव्हरटेक करत येणाºया कारला वाचविण्यासाठी अर्जंट ब्रेक मारला. त्यात ट्रॉलीचा हूक तुटून चक्क ट्रॅक्टर उलटून त्या खाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास विद्यापीठाच्या प्रवेशद्वाजवळ महामार्गावर घडली.दीपक जगन्नाथ महाजन (३०, रा़ आंचळगाव ता़ भडगाव) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे़ दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी कार सोडून कार चालक फरार झाला होता तर कारचे एका बाजूने नुकसान झाले होते़आंचळगाव येथील महारू पाटील यांनी ममुराबाद येथून विकत घेतलेला कडब्याचा चारा घेऊन जाण्यासाठी दीपक आणि त्याचा चुलत भाऊ मोहन रमेश महाजन हे वेगवेगळ्या ट्रॅक्टरने शुक्रवारी सकाळी ममुराबाद येथे आले होते. दुपारच्या सुमारास चारा घेऊन दोन्ही ट्रॅक्टर गावाकडे परतण्यासाठी निघाले़ दोघे ट्रॅक्टर एकामागे एक असे चालत होते़ त्याचबरोबर महारू पाटील हे सुध्दा दुचाकीवरून मागून येत होते़ओव्हरटेक करत आली कारदीपक हा ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९़ बीजी ५२३७ हे चालवत होता. तर त्याच्या मागे चुलत भाऊ मोहन दुसरे ट्रॅक्टर चालवत होता. विद्यापीठाजवळून जात असताना पाळधीकडून भरधाव वेगाने कार (एमएच़२९़ बीवाय़४५००) येत होती़ त्यात त्या कारने भरधाव वेगात मालवाहतूक चारचाकी चाकीला ओव्हरटेक केले. दरम्यान, ही कार ट्रॅक्टरवर धडकेल म्हणून दीपकने अर्जंट ब्रेक दाबला. यात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हूक तुटला आणि ट्रॉली चक्क दोन चाकांवर उभी राहीली़२० ते ३० फुटापासून मारला ब्रेकसमोरून ओव्हरटेक करत येत असलेली कार दिसताच दीपक त्याने कारला वाचविण्यासाठी तब्बल वीस ते तीस फुटापर्यंत ब्रेक लावून धरला होता़ मात्र, भरधाव कारमुळे अपघात झाला़ अपघात एवढा भिषण होता की, ट्रॅक्टरचे चाक सुध्दा फुटले व ट्रॅक्टरच्या काही भागांचा चुराडा झाला होता़वडील रुग्णालयातच झाले बेशुद्धदीपकचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी गावात वाºयासारखी पसरली. दीपकचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात ठेवला होता. वडील जगन्नाथ महाजन, भाऊ देवानंद, मावशी इंदूबाई, मावसभाऊ रवींद्र हे रुग्णालयात आले होते. घरातील कर्ता मुलगा गेल्याने कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. वडील बाहेरच बसून रडत असताना ते अचानक बेशुद्ध पडले. त्यांना लागलीच उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले.दोन्ही मुले झाली पोरकीदीपक महाजन याच्या पश्चात आई वत्सलाबाई, वडील जगन्नाथ, पत्नी भावना, मुलगा लकी (५) व हितेश (दीड वर्ष), भाऊ देवानंद असा परिवार आहे. दीपक हा घरातील मोठा मुलगा आहे.ट्रॅक्टर उलटताच चालक दाबला गेलाट्रॉलीचा हुक तुटल्यानंतर ट्रॅक्टर आणि कारची धडक झाली़ अन् क्षणात ट्रॅक्टर उलटे झाले़ त्या ट्रॅक्टरखाली दबून दीपक महाजन याचा जागीच मृत्यू झाला़महामार्गावर वाहतूक ठप्पट्रॅक्टर आणि कारच्या अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती़ त्यानंतर तालुका पोलीस अरूण निकुंभ यांच्यासह वाहतूक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जावून क्रेनच्या सहाय्याने कार आणि ट्रॅक्टरला रस्त्याच्या बाजूला केले़ नंतर वाहतूक सुरळीत केली़ ट्रॅक्टर उलटल्यामुळे संपूर्ण डिझेल हे रस्त्यावर पडलेले होते़ यावेळी धनश्याम पवार, प्रदीप बडगुजर, सुनील पाटील, हितेश पाटील, चंद्रकांत पाटील या पोलिसांची उपस्थिती होती़ 

टॅग्स :Jalgaonजळगाव