शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

सरोद वादन... तारकांचं संभाषण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 16:25 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘शास्त्रीय वाद्यसंगीत आणि रजतपट’ या सदरात जळगाव आकाशवाणीच्या सेवानिवृत्त उद्घोषिका डॉ.उषा शर्मा लिहिताहेत सरोद वादक उस्तादअली अकबरखान यांच्याबद्दल...

आकाशवाणी भोपाळतर्फे रवींद्र भवनात उस्ताद अमजदअली खाँ यांच्या सरोदवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्यक्ष बघण्याचा, ऐकण्याचा तो सुवर्ण योग होता. प्रसन्न, हसरं आणि विलक्षण तेजस्वी व्यक्तिमत्त्व बघून मी हरखून गेले आणि क्षणातच ‘सरोद-घर’ला पोहोचले.संगीत-सम्राट तानसेन यांच्या जन्मस्थळी ग्वाल्हेरला तीनशे वर्षाहून अधिक जुनं असं हे संगीत-तीर्थस्थळ सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांचे पिताश्री आणि गुरू उस्ताद हाफिज अली खाँ यांचं स्मृती स्थान... नतमस्तक झाले. त्या सातव्या-आठव्या पिढीसमोर ज्यांनी ‘सरोद’ या वाद्याला आभाळाएवढी उंची दिली, तद्वत नमस्कार केला; तो उस्तादअली अकबरखाँ, उस्ताद अल्लाउद्दीन खाँ, आशिष खाँ, पद्मभूषण शरण राणी आणि डॉ.वीणा चंद्रा यांना!उस्ताद अमजद अली खाँ यांचे पूर्वज अफगाणिस्तानातून आलेत. ते ‘रबाब’ वाजवीत. (काबुलीवाला या चित्रपटातील ऐ मेरे प्यारे वतन या देशभक्तीपर गीतामध्ये आणि जंजीर या चित्रपटातील यारी है ईमान मेरा या गीतात रबाब या वाद्याचा वापर केल्याचं सुजाण रसिकांना आठवत असेल) या रबाबपासूनच पुढे सरोदचा आविष्कार झाला असं म्हणतात... सरोद या फारसी शब्दाचा अर्थच मूळी संगीत... मौसिकी किंवा तरन्नुम असा आहे.उस्तादअमजद अली खाँ यांनी अमीर खुसरो ते मिर्ज़ा गालिब यांच्या जवळ-जवळ ४० गज़ल स्वरबद्ध केल्या आहेत. या ‘गुफ्तगू’नंतर त्यांचा ‘वादा’ नामक अल्बम प्रकाशित झाला. (गीतकार- गुलज़ार, गायक रुपकुमार राठोड आणि साधना सरगम) या शिवाय ‘यारा’ या अल्बममध्ये डॉ.मदन गोपाल सिंह यांची गीतं, गायक पंकज उधास आणि ‘शांती’ नावाची वाद्यवृंद रचनादेखील सर्व रसिकांना ज्ञात आहे.‘सरोद’ हे वाद्य रजतपटाच्या माध्यमातून सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं ते पद्मविभूषण उस्तादअली अकबरअली खाँ यांनी. सध्याच्या बांग्ला देशातील शिवपूर या गावात जन्मलेल्या खाँ साहेबांनी भारतीय अभिजात संगीताला जगभर मान्यता मिळवून दिली. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिला सार्वजनिक कार्यक्रम पेश केला. भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रात आयोजित कार्यक्रमातदेखील त्यांनी सरोदवादन सादर केलं. येहू दिन मेनूहिन, जॉन हॅण्डी गुरुबंधू पंडित रवीशंकर यांच्यासमवेत जुगलबंदीचा आनंद रसिकांनी लुटला.उस्तादअली अकबरखाँ यांनी आयव्हरी मर्चंट यांच्या ‘हाऊस होल्डर’ सत्यजित रे यांच्या ‘देवी’, बर्नाडो वटेलुस्सी यांच्या ‘लीटलबुद्धा’ या चित्रपटांना पार्श्वसंगीत दिलं. त्याचप्रमाणे ‘आँधियाँ’ (१९५२) आणि ‘हमसफर’ (१९५३) या हिंदी चित्रपटांनाही त्यांनी पार्श्वसंगीत दिलं. चेतन आनंद यांच्या आँधिया चित्रपटातील गीतं पंडित नरेंद्र शर्मा यांची होती. पैकी ‘वो चाँंद नही’ आणि ‘दिल का खजाना’ ही गाणी त्या काळी गाजली, नवकेतनच्या ‘हमसफर’ याही चित्रपटात देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांच्या भूमिका होत्या. सर्व गीतं साहिर लुधियानवी यांची! गीता दत्त यांनी गायलेली ‘मत करो किसीसे प्यार’ आणि ‘हसीन चाँदनी’, तर लता दीदीनं गायलेलं ‘कोई दूर बजाए बांसुरी’ या गीताचं मनापासून स्वागत झालं.नूतन यांच्या स्मरणार्थ एक विशेष गीतबहार कार्यक्रम आखताना उस्तादअली अकबर खाँ आकाशवाणी लखनौला संगीत निर्देशक होते. याची आठवण झाली आणि मी सुखावून गेले. ‘सुनो, छोटीसी गुडिया की लम्बी कहानी’ या गीताला खान साहेबांची सरोद म्हणजे ‘जैसे तारों की बात सुने रात सुहानी’ मल्हार रागाचा संबंध आभाळातील सरींशी आणि दीपक रागाचा तेवणाऱ्या दिव्यांशी असायचा असं म्हणतात. पण आजच्या काळात ‘सीमा’ चित्रपटातील हे गीत म्हणजे अंत:करणाला स्पर्श करून मिटल्या डोळ्यातून बरसणाºया सरीच! गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार, शंकर-जयकिशन क्षणभर विसरायला होतात. भिडत राहतात ते खानसाहेबांच्या सरोदचे स्वर आणि लतादीदीचा मर्मस्पर्शी आवाज!आणखी एक अविस्मरणीय गीत. सिनेमा-चित्रलेखा, गीत-साहीर, संगीत- रोशन आणि गायक महंमद रफी! आठवलं? होय... तेच‘मन रे तू काहे ना धीर धरे?’ गीताचे बोल लक्षात राहतात आणि आपणही गाऊ लागतो अगदी खाँ साहेबांच्या सरोदचे स्वरदेखील! आपल्याला समजत नाही की राग यमन आहे किंवा काय... स्वर कानात-हृदयात ओठांवर ठाण मांडून असतात. या महान कलाकारांची सरोद ऐकताना डोळे मिटावे तुम्हाला नक्कीच भास होईल.‘सुहानी रात है और तारों की बात है।’-डॉ.उषा शर्मा, जळगाव

टॅग्स :musicसंगीतJalgaonजळगाव