मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : आषाढी एकादशी परंपरेने पंढरीला आपल्या लवाजम्यासह विठूरायाच्या भेटीला गेलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे स्वस्थळी श्रीक्षेत्र कोथळी येथे मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी आगमन होत आहे. यानिमित्ताने आयोजित दिंडी स्पर्धेकरिता ८२ भजनी मंडळांनी नोंदणी केली असून, ग्रामस्थांची स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे.वारकरी संप्रदाय दिंडी स्पर्धा तीन गटात होणार असून, स्वतंत्र बक्षिसे आहेत. बाल गटात आठ, महिला गटात ४२ व पुरूष गटात ३२ भजनी मंडळांची नावे नोंदणी झाली आहे. शहरात वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी अनेक मंडळे, संस्था हा सोहळा अधिकाधिक कल्पकतेने साजरा करण्यासाठी नियोजन करित आहेत. नगरपंचायत, शाळा, महाविद्यालय आपापल्या परीने सहभागी होणार आहेत. यावर्षी आगमन सोहळा तपपूर्ती वर्ष व पीकपाणी चांगले असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मुक्ताईनगर सिव्हील सोसायटीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नवीन मंदिर येथे आयोजित केले आहे.दोन लाख पोळ्यांचा महाप्रसादमुक्ताईनगर नगरीत मात्र परंपरेने आषाढीला पंढरपूर येथे जाणाºया संत मुक्ताबाई पालखीचे स्वस्थळी आगमनानिमित्ताने आयोजित सोहळ्यात कुठलाही धर्म, पंथ, संप्रदाय, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता मुक्ताईनगर, कोथळी, सालबर्डी, हरताळे, उचंदे, शेमळदे, सातोड, निमखेडी खुर्द, सारोळा या गावातील ग्रामस्थ मात्र मनोभावे परतीच्या वारकऱ्यांची यथोचित, आदरातिथ्याने स्वागत करतात. यासाठी प्रत्येक घराघरातून बनविलेल्या दोन लाख पोळी संकलित केल्या जाणार आहेत. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये या पोळ्या महाप्रसाद स्थळी आणल्या जातात. महाप्रसाद, काला, भोजन एकत्रितपणे करतात. यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. पंचक्रोशीतील गावचे गाव या सोहळ्याला हजेरी लावतात. हे मुक्ताईनगर परिसराचे वैशिष्ट आणि सर्वधर्मसमभाव जोपासण्याची परंपरा आजही कायम आहे.
संत मुक्ताबाई पालखी ६ रोजी मुक्ताईनगरात परतणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 15:25 IST
आषाढी एकादशी परंपरेने पंढरीला आपल्या लवाजम्यासह विठूरायाच्या भेटीला गेलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे स्वस्थळी श्रीक्षेत्र कोथळी येथे मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी आगमन होत आहे.
संत मुक्ताबाई पालखी ६ रोजी मुक्ताईनगरात परतणार
ठळक मुद्देसोहळा घराघरातून दोन लाख पोळ्या संकलित करून महाप्रसाद होणारदिंडी स्पर्धेकरिता ८२ भजनी मंडळांची नोंदणी