संजय पाटील यांच्याकडील नगरअभियंत्याचा पदभार काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST2021-07-31T04:18:43+5:302021-07-31T04:18:43+5:30
अमळनेर : नगरपरिषदेत नगरअभियंता पद असतानाही पाच वर्षांपासून बेकायदेशीररित्या अंदाज पत्रकांवर व तांत्रिक मान्यता देणाऱ्या अभियंता संजय पाटील यांचे ...

संजय पाटील यांच्याकडील नगरअभियंत्याचा पदभार काढला
अमळनेर : नगरपरिषदेत नगरअभियंता पद असतानाही पाच वर्षांपासून बेकायदेशीररित्या अंदाज पत्रकांवर व तांत्रिक मान्यता देणाऱ्या अभियंता संजय पाटील यांचे अधिकार काढून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. तसेच त्यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेशात म्हटले आहे.
रामकृष्ण भगवान बागुल यांनी याबाबत नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. त्यात अमळनेर नगरपरिषदेत संजय पाटील हे बेकायदेशीररित्या नगर अभियंत्याचा पदभार सांभाळत असल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच अधिकार नसतांना अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता दिल्या आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना वारंवार चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सांगूनही मुख्याधिकाऱ्यांनी अहवाल सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. उपयुक्त नगरपरिषद संचालनालय मुंबई यांनी चौकशी करून अहवाल ७ दिवसात मागितला होता तरी मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी केलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संजय पाटील हे नगरअभियंता यांच्या अखत्यारीत काम करतील व नगरअभियंता हे पद रिक्त झाल्यावर देखील संजय पाटील यांना सह्या करण्याचे अधिकार नसतील, असे आदेश दिले आहेत.