आरबीआय एमएसएमई उच्चाधिकार समितीवर संजय दादलिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:13 IST2021-02-25T23:13:41+5:302021-02-25T23:13:54+5:30
जळगाव : राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी धोरणात्मक निर्णय ठरविण्यासाठी व या विषयी सूचना देण्यासाठी असलेल्या रिझर्व्ह बँक ...

आरबीआय एमएसएमई उच्चाधिकार समितीवर संजय दादलिका
जळगाव : राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी धोरणात्मक निर्णय ठरविण्यासाठी व या विषयी सूचना देण्यासाठी असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या उच्चाधिकार समितीच्या महाराष्ट्र-गोवा राज्याचे सदस्य म्हणून जळगावातील उद्योजक, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय दादलिका यांची निवड करण्यात आली आहे.
सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी व बँकांकडे या उद्योगांसाठी आवश्यक पाठपुरावा करणे यासाठी कार्य करणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग उच्चाधिकार समितीवर जळगावला स्थान मिळाले आहे. यात दादलिका यांची निवड केल्याचे आरबीआयने त्यांना कळविले व तसे पत्रही दिले. या निवडीचा राज्यभरातील उद्योगांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दादलिका यांनी सांगितले.