शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल

By विजय.सैतवाल | Updated: February 7, 2024 03:30 IST

वाळू माफियांची मुजोरी: डोक्याला गंभीर जखम

जळगाव : अवैध वाळू वाहतूक, उपसा व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना सुरूच असून मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार (५७) यांच्यावर सात ते आठ वाळू माफीयांनी हल्ला केला  लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करण्यात आल्याने कासार यांना गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यात त्यांचा मोबाईलदेखील फोडण्यात आला असून शासकीय वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे.

ही घटना तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान घडली. घटनेनंतर कासार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी रात्रीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलिस ताफा दाखल झाला होता.जळगाव शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक व उपसा सुरू असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे  मंगळवार,६ फेब्रुवारी रोजी रात्री वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहनाने (क्र. एम एच २८, सी ६४२१) कारवाई करण्यासाठी गेले होते. तरसोद फाटा ते नशिराबाद  दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर या पथकाने पकडले. यातील दुसरे वाहन न थांबता पुढे गेल्याने त्याचा पाठलाग करून त्याला जळगावच्या दिशेने परत आणण्यात आले व  त्या ठिकाणी तहसीलदार विजय बनसोडे थांबून होते. दुसरीकडे सोपान कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना सात ते आठ जण त्यांच्या दिशेने आले व थेट त्यांनी कासार यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. डोक्याला दोन सेंटीमीटर एवढी जखम झाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

चित्रीकरण होत असल्याने मोबाईलही फोडला

हल्लेखोरांनी कासार यांच्यावर हल्ला तर केलाच व वाहन देखील फोडले.  त्यावेळी कासार यांनी हे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्यास सुरुवात केली त्यावेळी हल्लेखोरांनी मोबाईल घेऊन तो फोडला. या हल्ल्यात शासकीय वाहनाचे देखील काचा  फुटल्या आहे.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह अधिकारी रुग्णालयात पोहोचले

घटनेची माहिती मिळतात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नाखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित,  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, यांच्यासह पोलिस ताफा रुग्णालयात पोहोचला होता.  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती जाणून घेत तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी पथक रवाना केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूJalgaonजळगावPoliceपोलिस