वाळूच्या डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले; महिनाभरातील चौथी घटना

By Ajay.patil | Published: March 28, 2023 03:48 PM2023-03-28T15:48:45+5:302023-03-28T15:49:06+5:30

डंपर, ट्रॅक्टरचालकांच्या वेगावर नियंत्रण येणार का ? : महिनाभरातील चौथी घटना

Sand dumper crushes 15 goats; Fourth incident in a month in chincholi jalgaon | वाळूच्या डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले; महिनाभरातील चौथी घटना

वाळूच्या डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले; महिनाभरातील चौथी घटना

googlenewsNext

जळगाव - तालुक्यातील चिंचोली गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल १५ बकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या धडकेत सर्व १५ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. डंपर व ट्रॅक्टरच्या धडकेत अपघात झाल्याची या महिन्यातील ही चौथी घटना आहे. या घटनेनंतर चिंचोली ग्रामस्थांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

चिंचोली येथील कैलास लटकन कोळी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अनेक वर्षांपासून कैलास कोळी हे शेळी पालनाचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे २५ ते ३० बकऱ्या असून,  बुधवारी सकाळी ८ वाजता शेळ्या चारण्यासाठी चिंचोली भागातील वनक्षेत्रात गेले होते. त्यानंतर दुपारी आपल्या बकऱ्या घेवून घरी येत असताना, छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गालगत जामनेरहून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने ((एम.एच. १९ वाय ७७७३) रस्ता ओलांडणाऱ्या बकऱ्यांना अक्षरश चिरडून टाकले. त्यात १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जमा झाले गाव

या घटनेची माहिती मिळताच चिंचोली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डंपर चालकाला पकडून ठेवले. त्यानंतर काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संबधित डंपर चालकाला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलीसांकडे कोणतीही नोंद झाली नव्हती. दरम्यान, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार डंपर हे जामनेर येथे  वाळू घेवून गेले होते. वाळू टाकल्यानंतर हे डंपर जळगावच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली. घटना घडली तेव्हा डंपरमध्ये वाळू नव्हती.

महिनाभरातील चौथी घटना...

वाळूने भरलेल्या व वाळू वाहतूक करून खाली जाणाऱ्या डंपर व ट्रॅक्टरने वाहनधारक व मुक्याप्राण्यांना उडविल्याची या महिन्यातील ही चौथी घटना आहे. १ मार्च रोजी आव्हाणे रस्त्यावर वाळूच्या ट्रॅक्टरने दुचाकीने जाणाऱ्या माय-लेकांना उडविले होते. त्यानंतर ३ मार्च रोजीच कानळदा रस्त्यावर वाळूच्या खाली ट्रॅक्टरने बैलजोडीला उडविले होते. त्यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता. तर २४ मार्च रोजी शहरातील टॉवर चौकात वाळूच्या डंपरने शिक्षिकांच्या चारचाकीला ठोकल्याने दोन शिक्षीका व शिक्षक जखमी झाले होते. आता पुन्हा चिंचोलीला १५ बकऱ्यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने उडविल्याने १५ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अनधिकृत वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाकडून तर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. मात्र, त्यांच्या वेगावर देखील नियंत्रण आणण्यास प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने, मुक्या प्राण्यांनाही जीव गमवावा लागत

Web Title: Sand dumper crushes 15 goats; Fourth incident in a month in chincholi jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.