चिंचोली गावाजवळ वाळूच्या डंपरने तरूणाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:46 IST2018-06-22T23:44:19+5:302018-06-22T23:46:49+5:30

जळगाव-औरगांबाद महामार्गावरील चिंचोली गावाजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने भारत शालिक बागुल (वय-३७, रा़ मोहाडी, ता़ जामनेर) या दुचाकीस्वारास धडक देत चिरडल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली़

A sand dump near Chincholi village crushed the youth | चिंचोली गावाजवळ वाळूच्या डंपरने तरूणाला चिरडले

चिंचोली गावाजवळ वाळूच्या डंपरने तरूणाला चिरडले

ठळक मुद्देडंपरसह चालक ताब्यातरूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोशडिझेल घेण्यासाठी आला अन् जीव गमावला

जळगाव- जळगाव-औरगांबाद महामार्गावरील चिंचोली गावाजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने भारत शालिक बागुल (वय-३७, रा़ मोहाडी, ता़ जामनेर) या दुचाकीस्वारास धडक देत चिरडल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली़ पोलिसांनी डंपरसह चालक विवेक दिनकर सपकाळे (रा़ खेडी खु़) यास ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, भारत बागुल हे शुक्रवारी दुपारी १२ वाजता ट्रॅक्टरसाठी डिझेल घेण्यासाठी नेरी येथे जातो असे सांगून दुचाकीने (क्ऱएमएच़१९़सीपी़६०१५) कॅन घेऊन घरून निघाले़ दरम्यान, त्यांना जळगाव शहरात काही काम असल्यामुळे ते दुपारी जळगावला आले़ त्यानंतर काम आटोपून दुचाकीने घराकडे जाण्यासाठी रवाना झाले़ जळगाव-औरंगाबाद महामार्गावरुन जात असताना चालक विवेक सपकाळे हा देखील खेडी येथून डपंरमध्ये वाळू भरून त्याच रस्त्यावरून नेरीला जात होता़
गतीरोधकावर दिली धडक
भारत हे डिझेल घेऊन चिंचोली गावाजवळून जात असताना गतिरोधक ओलांडत असताना मागून भरधाव वेगात येत असलेला डंपरचालक विवेक याने बागुल यांच्या दुचाकी धडक दिली़ अन् ते खाली कोसळताच त्यांच्या अंगावरून डंपरचे चाक जाऊन ते चिरडले गेले़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर दुचाकीचेही नुकसान झाले़

Web Title: A sand dump near Chincholi village crushed the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.