गिरणा नदीपात्रात वाळूच्या डंपरने गुराख्यास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 19:42 IST2018-08-17T19:39:07+5:302018-08-17T19:42:53+5:30
आव्हाणी (ता.धरणगाव) शिवारातील गिरणानदीपात्राजवळ गुरे चारण्यास गेलेले शेतकरी पुंडलिक कौतिक पाटील (वय-६५, रा़ वडनगरी) यांना वाळूच्या डंपरने धडक दिली. ग्रामस्थांनी आरडा-ओरड करताच खाली पडलेल्या शेतकऱ्याला चिरडत डंपर सोडून चालक फरार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़

गिरणा नदीपात्रात वाळूच्या डंपरने गुराख्यास चिरडले
जळगाव- शहरापासून जवळच असलेल्या आव्हाणी (ता.धरणगाव) शिवारातील गिरणानदीपात्राजवळ गुरे चारण्यास गेलेले शेतकरी पुंडलिक कौतिक पाटील (वय-६५, रा़ वडनगरी) यांना वाळूच्या डंपरने धडक दिली. ग्रामस्थांनी आरडा-ओरड करताच खाली पडलेल्या शेतकऱ्याला चिरडत डंपर सोडून चालक फरार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी डंपर जाळून टाकला. यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ तोच हद्दीच्या वादात जळगाव व धरणगाव येथील तहसीलदार घटनास्थळी न आल्याने तब्बल चार तास मृतदेह घटनास्थळी पडून राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अखेर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी घटनास्थळी जाऊन संतप्त जमावाची समजूत घातली. गुन्हा दाखल करण्याबाबत सांगितल्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले़