वाळूच्या डंपरची धडक, तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:02 IST2019-07-26T22:02:05+5:302019-07-26T22:02:41+5:30
उत्राण जवळील अपघात : वनकोठा येथे शोककळा

वाळूच्या डंपरची धडक, तरुण जागीच ठार
एरंडोल : येथून उत्राणकडे गिरणा नदीवर वाळू भरण्यासाठी जात असलेल्या डंपरने (एम.एच.१८- ए.ए.८९२७ ) समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुंदन सुभाष पाटील (वय ३६) हा दुचाकी चालक जागीच ठार झाला.
ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उत्राण फाट्याजवळ घडली. यांनतर डंपर चालक जितेंद्र प्रभाकर मराठे रा.नागोबा मढी,एरंडोल हा स्वत: हुन पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. दरम्यान मृत कुंदन पाटील हा भातखेडा येथे मामाच्या गावाहून दुचाकीने घरी वनकोठ्याला जात असताना हा अपघात झाला. त्यावेळी कुंदनला खूप अंतर फरफटत नेण्यात आले.त्यात त्यांच्या डोक्याला व कंबरेस मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला.
या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार प्रदीप चांदोलकर, हे.कॉ. भिमराव मोरे हे तपास करीत आहे. मृत कुंदन पाटील यांचे मूळ गाव सामनेर येथील असुन तो. एम.आर.म्हणुन कार्यरत होता. तो कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिण, आई, वडील होत.