महात्मा गांधी यांना नमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:12+5:302021-02-05T05:53:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शहरातील विविध समाजसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये ...

महात्मा गांधी यांना नमन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शहरातील विविध समाजसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांना नमन करून त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, विश्वशांतीसाठी केलेले प्रयत्न, सत्य, अहिंसा या कार्याला उजाळा देण्यात आला. विविध संस्थांनी गांधी पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी केली.
जिजामाता माध्यमिक विद्यालय
जिजामाता माध्यमिक विद्यालय हरिविठ्ठल नगर येथे हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र आर. खोरखेडे यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी किशोर पाटील, संजय खैरनार, आशा पाटील, कृष्णा महाले, संगीता पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास तायडे तर आभार दिनेश सोनवणे यांनी मानले.
मातोश्री प्रेमाबाई जैन विद्यालय
कै. मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी प्रतिमा पूजन केले. सूत्रसंचलन रोहिणी सोनवणे यांनी तर आभार मोहिनी चौधरी यांनी मानले. यशस्वितेसाठी रूपाली वानखेडे, अविनाश महाजन, नरेश कोळी, अर्चना धांडे, धनश्री पिरके, दीपक भोळे यांनी परिश्रम घेतले.
राज माध्यमिक विद्यालय
राज माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी प्रतिमा पूजन केले. पी.डी. नेहते के.डी. बऱ्हाटे, ए.डी. महाजन उपस्थित होते.
महिला महाविद्यालय
अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचालित कला, वाणिज्य आणि गृहविज्ञान महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे, उपप्राचार्य डॉ. सतीश जाधव, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. सोमनाथ लोकरे उपस्थित होते.