जामनेरला अफवा व भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:45 IST2020-03-30T20:44:50+5:302020-03-30T20:45:52+5:30

कोरोना बाधीताच्या संसर्गातील व्यक्तींच्या शहरातील वास्तव्यामुळे येथे सोमवारी दिवसभर उलटसुलट चर्चा व अफवा पसरविल्या जात होत्या.

Rumors and fears to Jamner | जामनेरला अफवा व भीती

जामनेरला अफवा व भीती

ठळक मुद्देपॉझिटीव्हच्या अफवा निराधारअफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार

जामनेर, जि.जळगाव : कोरोना बाधीताच्या संसर्गातील व्यक्तींच्या शहरातील वास्तव्यामुळे येथे सोमवारी दिवसभर उलटसुलट चर्चा व अफवा पसरविल्या जात होत्या. अहवाल पॉझिटीव्हच्या अफवा निराधार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे यांनी सांगितले की, शहरात कोणीही संशयित नाही, कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

Web Title: Rumors and fears to Jamner