रूख्मिनी नगरात बंद घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 21:33 IST2020-02-03T21:33:20+5:302020-02-03T21:33:33+5:30
जळगाव - हरिविठ्ठलनगर परिसरातील रूख्मिनीनगरातील धनंजय सोनवणे यांच्या बंद घराचा कडी-कोंयडा तोडून अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सकाळी ...

रूख्मिनी नगरात बंद घर फोडले
जळगाव- हरिविठ्ठलनगर परिसरातील रूख्मिनीनगरातील धनंजय सोनवणे यांच्या बंद घराचा कडी-कोंयडा तोडून अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे़ दरम्यान, सोनवणे हे बाहेरगावी असल्यामुळे अद्याप पोलिसात कुठलीही नोंद नसून घरातून किती ऐवज चोरीला गेला आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
रूख्मिनी नगरात धनंजय सोनवणे कुटूंबीसह राहतात़ दरम्यान, कुटूंबातील सर्व सदस्य बढोदा येथे नातेवाईकांकडे गेले असल्यामुळे घरात कुणीही नव्हते़ त्यामुळे घर कुलूप बंद होते़ हीच संधी साधत चोरट्यांनी घरात डल्ला मारला़ सोमवारी सकाळी हा प्रकार शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्चरित धनंजय सोनवणे यांना चोरीची माहिती दिली़ त्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात त्यांनी घटनेची माहिती दिली़ मात्र, सोनवणे हे घरी आल्यानंतर चोरट्यांनी एकूण किती ऐवजावर डल्ला मारला याचा उलगडा होईल.