बियाणी पब्लिक स्कूलच्या प्राचार्यपदी रुद्रसेन गंठिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 22:40 IST2021-01-03T22:40:20+5:302021-01-03T22:40:39+5:30

बियाणी पब्लिक स्कूलच्या प्राचार्यपदी रुद्रसेन गंठिया यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

Rudrasen Ganthia as the Principal of Biyani Public School | बियाणी पब्लिक स्कूलच्या प्राचार्यपदी रुद्रसेन गंठिया

बियाणी पब्लिक स्कूलच्या प्राचार्यपदी रुद्रसेन गंठिया

 

भुसावळ : शहरातील रामेश्वर नगर, प्रोफेसर कॉलनीतील बियाणी पब्लिक स्कूलच्या प्राचार्यपदी रुद्रसेन गंठिया यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी यांनी ही नियुक्ती केली आहे. यावेळी यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी.एम.पाटील, बियाणी ग्रुपचे मॅनेजर गोपाळ ठाकूर, राजू पारीख, प्रवीण भराडिया आदी उपस्थित होते. 
रूद्रसेन गंठिया यांना १५ वर्षाचा शिक्षण क्षेत्राचा अनुभव आहे. येणाऱ्या आगामी काळात ते शिक्षण क्षेत्रातून चांगले विद्यार्थी घडवतील व  शाळेसंदर्भात कोणालाही समस्या असल्यास प्राचार्यांशी संपर्क करावा, असे डॉ.संगीता बियाणी यांनी कळविले आहे.
 

Web Title: Rudrasen Ganthia as the Principal of Biyani Public School