भडगाव-कनाशी रस्त्यासाठी सव्वातीन कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST2021-09-26T04:17:52+5:302021-09-26T04:17:52+5:30

आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून कजगाव-वाडे गटातील विविध रस्त्यांना राज्याच्या अंदाजपत्रकातून मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सव्वातीन कोटी रुपयांना ...

Rs 25 crore sanctioned for Bhadgaon-Kanashi road | भडगाव-कनाशी रस्त्यासाठी सव्वातीन कोटी रुपये मंजूर

भडगाव-कनाशी रस्त्यासाठी सव्वातीन कोटी रुपये मंजूर

आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून कजगाव-वाडे गटातील विविध रस्त्यांना राज्याच्या अंदाजपत्रकातून मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सव्वातीन कोटी रुपयांना मंजुरी करण्यात आली आहे. भडगाव तालुक्यातील कनाशीचा तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभरात लौकिक असून, महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने दर्शनाला येत असतात. त्यामुळे भाविकांची व स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता

आमदार किशोर पाटील यांनी दखल घेत या कामाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले होते.

आज सकाळी साडेदहा वाजता कोठली (ता. भडगाव) येथे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विकास पाटील, डॉ. विशाल पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास पाटील, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, बात्सरचे संजय पाटील, बाजार समितीचे प्रशासक युवराज पाटील, विजय पाटील, कोठलीचे सरपंच कांतीलाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील, माजी तालुकाप्रमुख दीपक पाटील, गोंडगावचे राहुल पाटील, बोदर्डेचे उपसरपंच बबलू पाटील, बांबरूड प्र. ब.चे प्रकाश परदेशी, पप्पू पाटील, बांधकाम विभागाचे एस. आर. राऊत, भास्कर पाटील, भागवत पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते.

250921\25jal_1_25092021_12.jpg

कोठली येथे रस्ता फलक अनावरणप्रसंगी आमदार किशोर पाटील, अधिकारी, शिवसेना, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरिक.

Web Title: Rs 25 crore sanctioned for Bhadgaon-Kanashi road