समाजभिमुखता हेच रोटरीचे ब्रीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 20:12 IST2018-07-18T20:12:09+5:302018-07-18T20:12:41+5:30
चाळीसगावला रंगला सोहळा : रोटरी मिल्कसिटी व संगमच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

समाजभिमुखता हेच रोटरीचे ब्रीद
चाळीसगाव, जि.जळगाव : रोटरी ही एक मानवी उत्थानाची चळवळ असून समाजभिमुखता हे तिचे प्रमुख अंग आहे. आगामी वर्षात हेच ध्येय ठेवून उपक्रम राबवू. चाळीसगाव तालुक्यात वेगळा ठसाही उमटवू, अशी ग्वाही रोटरी क्लब आॅफ मिल्कसिटी व रोटरी क्लब आॅफ संगमच्या नूतन पदाधिकाºयांनी दिली. अरिहंत मंगल कार्यालयात नुकताच पदग्रहण सोहळा पार पडला.
अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल राजेंद्र भामरे (मालेगाव) हे तर प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रांतपाल प्रसन्न गुजराथी (चोपडा), प्रमुख वक्त्या वैशाली देशमुख (नागपूर) आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी उल्लेखनीय काम करणाºया सदस्यांचा गौरव चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल, प्राचार्य राहुल कुलकर्णी, अशोक सुर्वे, लालचंद बजाज, अॅड. ओमप्रकाश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला.
मावळत्या पदाधिकाºयांनी आपल्या कारकिर्दीत राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन नीलेश गुप्ता, मेघा बक्षी यांनी, तर आभार प्रशांत शिनकर यांनी मानले. या वेळी भावी सहायक प्रांतपाल म्हणून प्राचार्य राहुल कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा राजेंद्र भामरे यांनी केली.
नूतन पदाधिकारी
रोटरी क्लब मिल्कसिटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र राजेड, सचिवपदी प्रकाश कुलकर्णी तर संगमच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुधीर पाटील, सचीवपदी प्रशांत शिनकर यांनी मावळत्या पदाधिकाºयांकडून पदभार स्वीकारला. इनरव्हील क्लब (मिल्कसिटी) अध्यक्षपदी दीपाली राणा, सचीवपदी माया सावंत तर इनरव्हील क्लब (संगम) अध्यक्षपदी आकांक्षा खंडाळकर, सचिवपदी उज्वला जाधव यांच्यासह रोटरॅक्ट क्लबचे नूतन पदाधिकारी म्हणून योगेश चव्हाण, आकाश धुमाळ, शुभम शेटे, पायल पाटील, श्वेता जगताप, धीरज पवार यांनीही माजी पदाधिकाºयांनी पदभार सुपूर्द केला.