रोटरी जळगाव स्टार्सने स्वीकारले अनाथ मुलींचे पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:52+5:302021-02-05T05:52:52+5:30
जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सने बालकल्याण समितीच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात रिमांड होममधील पाच अनाथ मुलींचे वयाच्या ...

रोटरी जळगाव स्टार्सने स्वीकारले अनाथ मुलींचे पालकत्व
जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सने बालकल्याण समितीच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात रिमांड होममधील पाच अनाथ मुलींचे वयाच्या १८ वर्षापर्यंत शिक्षण, संगोपनासह पालकत्व स्वीकारले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष वैजयंती तळेले, सदस्या डॉ. शैलजा चव्हाण, रोटरीच्या सहप्रांतपाल डॉ. अपर्णा मकासरे, संगीता पाटील, रोटरी स्टार्सचे अध्यक्ष धनराज कासट, मानद सचिव अश्विन मंडोरा, मुलींच्या सुधार गृहाचे सचिव संजय चौधरी, अधीक्षक जयश्री पाटील, मुलांच्या सुधार गृहाचे अधिक्षक डी. पी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी रोटरी स्टर्सचे सागर मुंदडा, सचिन बलदवा, योगेश कलंत्री, रोहित तलरेजा, विपुल पटेल, हितेश सुराणा, पुनीत रावलानी, शुभम मंडोरा, चंदन तोष्णीवाल, जिनल जैन, चिराग शाह, चेतन सोनी, अमित भवानी, धर्मेश गादिया यांनी परिश्रम घेतले.