गणेशाच्या आगमनाने बाजारात ‘रोषणाई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:41+5:302021-09-09T04:22:41+5:30
जळगाव : गणेशोत्सव फक्त दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या आकारांच्या आणि विविध रंगांचे प्रकाश टाकणाऱ्या विद्युतमाळा उपलब्ध ...

गणेशाच्या आगमनाने बाजारात ‘रोषणाई’
जळगाव : गणेशोत्सव फक्त दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या आकारांच्या आणि विविध रंगांचे प्रकाश टाकणाऱ्या विद्युतमाळा उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रा चौकातील विविध दुकानांच्या समोर दिवसभर ही रोषणाई सुरू असते. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या विविध रंगी माळांना पसंती दिली आहे. तसेच अनेक भाविक आपल्या घरी येणाऱ्या बाप्पासाठी लहान माळांना पसंती देत आहेत. त्यात यंदा मेड इन इंडिया माळांना चांगलीच पसंती आहे. ४० ते ५० रुपयांपासून या माळांची किंमत सुरू होते. तर १५०० रुपयांपर्यंतच्या विविध माळा बाजारात उपलब्ध आहेत.
यंदा मंडळांकडून फारशी सजावट किंवा आरास केली जाणार नाही. त्यामुळे मंडळांकडून या विद्युतमाळांना जास्त पसंती दिली जात आहे. त्यासोबतच काही प्रमाणात स्वस्त चायनीज विद्युतमाळांनादेखील बाजारात चांगली मागणी मिळत आहे. गणपती बाप्पासाठी यंदा स्टारच्या आकारातील तसेच रंग बदलणाऱ्यांना विद्युतमाळांना चांगलीच पसंती आहे.