पारोळा येथे धाडसी चोरी, रोख रकमेसह साडे सहा लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 12:50 IST2018-07-08T12:49:23+5:302018-07-08T12:50:17+5:30

दागिने चोरून पोबारा

The robbery of steal at Parola, with a cash amount of six and a half lakh lumpas | पारोळा येथे धाडसी चोरी, रोख रकमेसह साडे सहा लाखाचा ऐवज लंपास

पारोळा येथे धाडसी चोरी, रोख रकमेसह साडे सहा लाखाचा ऐवज लंपास

ठळक मुद्दे सर्व कुटुंब लग्नाला गेले होते घटनास्थळी स्वानपथकाला पाचारण

पारोळा, जि. जळगाव - पारोळा येथील व्यावसायिक प्रमोद लक्ष्मण शिरोळे यांच्याकडे ७ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांंनी दरवाजाचे कुलूप कापून घरात प्रवेश करीत कपाटात ठेवलेले २ ते ३ लाख रुपये रोख व ३ लाखाचे सोन्याचे दागिने असा सहा ते साडे सहा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
आशिया महामार्ग क्रमांक ४६ लगत व पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर प्रमोद शिरोळे यांचे रासायनिक खते, बी बियाणे विक्रीचे दुकान असून त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर राहतात. ७ रोजी प्रमोद शिरोळे यांच्या पुतण्याचे लग्न पाचोरा येथे असल्याने सर्व कुटुंब लग्नाला गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बाजूला असलेल्या जिन्याच्या साह्याने इमारतीच्या छतावरून जाऊन घराच्या मुख्य प्रवेशद्वारचे कुलूप कापले व घरात प्रवेश करीत कापटाचे कुलूप तोडून त्यात ठेवलेले रोख २ ते ३ लाख व ३ ते साडेतीन लाखाचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला.
शिरोळे कुटुंब रात्री एक ते सव्वा च्या सुमारास लग्न आटोपून घरी आले असता त्यांना मुख्य घराचे दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. ते घरातील बेडरूम मधील कपाटे उघडून पाहून शिरोळे यांच्या पत्नी मुली व मुलगा अंकुश याना रडू कोसळले.
प्रमोद शिरोळे यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत घरात चोरी झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला. घटनास्थळी स्वानपथकाला पाचारण करण्यात आले होत.

Web Title: The robbery of steal at Parola, with a cash amount of six and a half lakh lumpas