पारोळा तालुक्यातील शेवगे गावानजीक थरार, कु-हाडीचा धाक दाखवित वाहनधारकांना लुटले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 13:24 IST2018-02-02T13:14:18+5:302018-02-02T13:24:37+5:30

महिला पुरुषांना जबर मारहाण

Robbery in parola takuka | पारोळा तालुक्यातील शेवगे गावानजीक थरार, कु-हाडीचा धाक दाखवित वाहनधारकांना लुटले  

पारोळा तालुक्यातील शेवगे गावानजीक थरार, कु-हाडीचा धाक दाखवित वाहनधारकांना लुटले  

ठळक मुद्देमोटारसायकल स्वारावर कु-हाडीने वार करून केले गंभीर जखमी शेतातून काढला पळ

ऑनलाईन लोकमत

पारोळ, जि. जळगाव, दि. 2 -  पारोळा - बोळे रस्त्यावर शेवगे प्र.ब.  गावाजवळ  5 ते 6 दरोडेखोरांनी गुरुवारी  रात्री 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान  रस्त्यावर झाड आडवे टाकून बोळेकडून येणा:या एक मोटारसायकल स्वारावर कु-हाडीने वार करून गंभीर जखमी केले. त्याच वेळी मागून येणा-या वाहनातून एका कार्यक्रमाहून येणा:या वाहनाकडे आपला मोर्चा या दरोडेखोरांनी वळवीत महिला पुरुषांना जबर मारहाण केली व महिलांच्या अंगावरील सोन्याची दागिने पोत सोनसाखळी हिसकावून मोबाईलही लंपास केले.  या वेळी वाहनातील महिलांना या दरोडेखोरांनी धमकवीत कुरडीचा धाक दाखवून पैशाची लूट केली शेतातून पळ काढला. 
या वेळी जवळच माजी जि.प. सदस्य डॉ. दिनकर पाटील यांच्या पेट्रोल पंपावर  वाहनातील लोकांनी  आपबीती सांगितली. घटनास्थळी डॉ. दिनकर पाटील, बोळेचे सरपंच योगेश गिरासे यांच्यासह शेवगे बोळे गावातील ग्रामस्थांनी या लोकांना मदत करीत रस्ता लूट झाल्याचे पारोळा पोलिसांना  कळविले. या वेळी पोलीस कर्मचारी कैलास भोई, पंढरी पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व चोरटे ज्या  दिशेने शेतातून पळाले त्यांचा शोध घेतला. 

Web Title: Robbery in parola takuka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.