दारूसाठी पैसे न दिल्याने लूट; दोघांवर तिघांचा चाकूहल्ला, दोघे जखमी

By विलास बारी | Updated: October 14, 2023 18:30 IST2023-10-14T18:30:01+5:302023-10-14T18:30:40+5:30

खिशातील पैसेही काढून घेतले

robbery for not paying for alcohol two were stabbed by three two injured | दारूसाठी पैसे न दिल्याने लूट; दोघांवर तिघांचा चाकूहल्ला, दोघे जखमी

दारूसाठी पैसे न दिल्याने लूट; दोघांवर तिघांचा चाकूहल्ला, दोघे जखमी

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तीन जणांनी महेंद्र नामदेव बडगुजर (२०, रा. शिवाजीनगर) यांच्या डोक्यावर, तर सनी मनोज जाधव याच्या हातावर चाकूने वार केला. यावेळी महेंद्रच्या खिशातील पाच हजार ६०० रुपयांची रोकड हिसकावून नेली. ही घटना दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री शिवाजीनगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र बडगुजर व त्याचा मित्र सनी जाधव हे शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता शिवाजीनगर हुडको परिसरात चहा पित असताना त्याठिकाणी गुफरानसोबत तनवीर उर्फ तन्या आणि लढ्ढा हे तिथे आले. त्यावेळी तिघांनी महेंद्रकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर महेंद्रने पैसे दिले नाही म्हणून त्याच्या डोक्यावर चाकून वार करून त्याच्या खिशातील पाच हजार ६०० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. यावेळी सनीच्या हातावरही चाकून वार करण्यात आला. याप्रकरणी महेंद्र बडगुजर याने शहर पोलिस फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: robbery for not paying for alcohol two were stabbed by three two injured