चाळीसगावमध्ये सशस्त्र दरोडा; एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 10:29 IST2019-04-03T10:21:19+5:302019-04-03T10:29:34+5:30
शिक्षक कॉलनी परिसरातील वना शेवरे यांच्या राहत्या घरी मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सुमारे ५ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केला.

चाळीसगावमध्ये सशस्त्र दरोडा; एक जण जखमी
जळगाव - शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील वना शेवरे यांच्या राहत्या घरी मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सुमारे ५ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केला. यामध्ये वना शेवरे यांचे चिरंजीव मनोज शेवरे यांच्या डोक्यावर टॉमीने वार करीत जखमी केले व कुटूंबातील सदस्यांना मारहाण केली. घरातील ४ ते ५ तोळे सोने व सुमारे १५ ते २० हजार असा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. जखमी मनोज यांना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरोडेखोर हे हिंदी भाषेत बोलत होते. बनियान व हाफ पॅंट परिधान केलेले होते. घरातील ४ मोबाईल नेत परिसरात मोबाईल फेकून देत पलायन केले. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी भेट देत परिसरात पाहणी केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.