रावेर तालुक्यात साईडपट्ट्या खोदाईने वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:33 IST2019-07-21T15:31:44+5:302019-07-21T15:33:53+5:30
उटखेडा ते सावखेडा दरम्यान रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदण्यात आलेल्या आहेत. संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

रावेर तालुक्यात साईडपट्ट्या खोदाईने वाहतुकीची कोंडी
उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : उटखेडा ते सावखेडा दरम्यान रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदण्यात आलेल्या आहेत. संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
उटखेडा ते सावखेडा या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. साईडपट्ट्या खोदणे, कच्चा मुरूम टाकणे अशी कामे सुरू असून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू आहे. चार दिवसापासून साईडपट्टी खोदलेली असून त्यात कच्या मुरुमाचा भराव नसल्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी डोकेदुखी ठरत आहे. त्यात साईडपट्टीच्या खोदाईमुळे दुहेरी वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे.
सध्या पावसाळयाच्या दिवसात रहदारी करणाऱ्या वाहनांना याचा प्रचंड त्रास होत आहे. या परिसरात केळीने भरलेले अवजड वाहने या रस्त्याने जास्त प्रमाणात रहदारी करीत असतात. साईडपट्टी खोदल्याने रस्ता अरूंद होऊन एखादा अपघात हाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधीत ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाला गती देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर करावेत व खोदलेल्या साईडपट्टीवर कच्चा मुरूम टाकून भराव करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.