चाळीसगाव येथे पुलावरुन रोडरोलर कोसळला, अवजड चाके निघळून अस्ताव्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 12:31 IST2017-12-31T12:28:58+5:302017-12-31T12:31:16+5:30
जीवितहानी टळली

चाळीसगाव येथे पुलावरुन रोडरोलर कोसळला, अवजड चाके निघळून अस्ताव्यस्त
ठळक मुद्दे बघ्यांची एकच गर्दी उसळली पुलाचे कठडे तोडून रोडरोलर खाली कोसळला.
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जळगाव, दि. 31- धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव येथे रविवारी सकाळी 9 वाजता रेल्वे पुलावरुन रोडरोलर खाली कोसळला. यामध्ये त्याचे चाकेही निखळले.
रेल्वे पुलावरून हा रोल जात असताना अचानक पुलाचे कठडे तोडून तो खाली कोसळला. सुदैवाने आजूबाजूला कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. रोडलरचे पुढचे व मागचे चाके निखळल्याने तो पुलाच्या खाली कोसळल्याचे सांगण्यात येत होते. रोडरोलर कोसळल्यानंतर या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.