धावडे रस्ता काटेरी झुडूपांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:43+5:302021-09-12T04:20:43+5:30
नांदेड, ता. धरणगाव : नांदेड-धावडे-सावखेडा या पाच कि. मी. लांबीच्या रात्रंदिवस वर्दळीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील साईड पट्ट्यांवर ठिकठिकाणी काटेरी ...

धावडे रस्ता काटेरी झुडूपांच्या विळख्यात
नांदेड, ता. धरणगाव : नांदेड-धावडे-सावखेडा या पाच कि. मी. लांबीच्या रात्रंदिवस वर्दळीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील साईड पट्ट्यांवर ठिकठिकाणी काटेरी झाडेझुडूपांचे साम्राज्य निर्माण झालेले असल्यामुळे रहदारीस अळथळा निर्माण होत आहे.
हा रस्ता रात्रंदिवस अतिशय रहदारीचा असून, या मार्गावर पाच ते सहा ठिकाणी धोकादायक वळणेदेखील आहेत. त्यात ठिकठिकाणी साईडपट्ट्यांच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडूपांची भर पडलेली आहे. परिणामी, समोरुन येणारे वाहन एकदम दिसून येत नाही. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास मोठी अडचण निर्माण होते. नांदेडपासून धावडेपर्यंतचा रस्ता धरणगाव सा. बां. विभागाच्या अखत्यारित तर धावडेपासून सावखेड्यापर्यंतचा अर्धा रस्ता अमळनेर सा. बां. विभागाच्या हद्दीत आहे.
सावखेड्याच्या पाटापासून ते गावातील भिल्ल वस्तीपर्यंतच्या रस्त्याची तर लहान -मोठ्या खड्ड्यांमुळे पार वाट लागलेली आहे. सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन साईडपट्ट्यांवरील काटेरी झाडे-झुडूपे जेसीबी यंत्रणेच्या सहाय्याने मुळासकट काढून दुर्दशा झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
110921\20210911_071621.jpg
सावखेडा -धावडे -नांदेड रस्त्याच्या साईडपट्टयांवर असे काटेरी झुडूपे निर्माण झालेली आहेत -छाया -राजेंद्र रडे