ऋषिकेश पिंगळे याचे एनआयडी परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 20:36 IST2020-08-31T20:36:03+5:302020-08-31T20:36:10+5:30
जळगाव : शहरातील ऋषिकेश प्रमोद पिंगळे या विद्यार्थ्याने नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील एनआयडीच्या प्रवेश परीक्षेत यश संपादन केले आहे. दरम्यान, ...

ऋषिकेश पिंगळे याचे एनआयडी परीक्षेत यश
जळगाव : शहरातील ऋषिकेश प्रमोद पिंगळे या विद्यार्थ्याने नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील एनआयडीच्या प्रवेश परीक्षेत यश संपादन केले आहे.
दरम्यान, तीन स्तरावर होणाऱ्या या परीक्षेत दर वर्षी तीस ते चाळीस हजार विद्यार्थी सहभाग नोंदवतात. त्यातून मोजक्याच विद्यार्थ्यांची यात निवड होत असते. तीनही टप्प्यात ऋषिकेशने आपल्या कौशल्याच्या बळावर यशस्वीपणे मिरीटमध्ये स्थान मिळविले आहे. ऋषिकेश हा सचिन मुसळे यांचा विद्यार्थी असून प्रमोद पिंगळे यांचा मुलगा आहे. त्याला नंदलाल गादीया यांचे मार्गदर्शन लाभले.