वरणगाव परिसरात पेट्रोल चोरणाऱ्यांचा उच्छाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 03:32 PM2021-01-06T15:32:39+5:302021-01-06T15:34:04+5:30

वरणगाव परिसरात पेट्रोल चोरणाऱ्यांचा उच्छाद वाढला आहे.

The rise of petrol thieves in Varangaon area | वरणगाव परिसरात पेट्रोल चोरणाऱ्यांचा उच्छाद 

वरणगाव परिसरात पेट्रोल चोरणाऱ्यांचा उच्छाद 

Next

वरणगाव, ता.भुसावळ : येथील सिध्देश्वरनगरसह इतर वेगवेगळ्या परिसरात दुचाकी वाहनांमधील पेट्रोल चोरणाऱ्यांच्या टोळक्याने  उच्छाद मांडला असून, नागरिकांच्या नाकात दम आणला आहे.                                              
वरणगाव शहराच्या विस्तारीत भागातील तसेच सिद्धेश्वरनगर परिसरातील  दुचाकी वाहनधारकांच्या वाहनांमधून पेट्रोल चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक खूपच  वैतागले असून नागरिकांच्या नाकात दम आणला आहे. पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
वरणगाव शहराच्या विस्तारीत भागातील सिध्देश्वर नगर, सम्राट नगर, लहुजी साळवे नगर आदी भागासह इतर भागातील दुचाकी वाहनधारक रात्री आपली वाहने घरासमोर उभी करतात. या संधीचा फायदा घेऊन काही भुरट्या चोरांच्या टोळ्या वाहनांतील पेट्रोल चोरीसाठी सक्रिय झाल्या आहेत. सकाळी वाहनधारक गाडी सुरू करण्यास गेले असता वाहनातील पेट्रोल चोरीला गेल्याचे लक्षात येते. या प्रकारामुळे वाहनधारकांना आपली वाहने पेट्रोल पंपापर्यंत ढकलत न्यावी लागत आहेत, तर पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीची वाहने सुसाट धावताना दिसत आहेत. मात्र, ही टोळी रंगेहाथ पकडली जात नसल्याने त्यांना कुणी जाब विचारत नाही. या घटनेचे गांभीर्य नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते व कुणीही पोलिसांत तक्रार द्यायला पुढे येत नाही  व या पेट्रोल चोरांना चांगलेच फावले आहे.
वाहनधारक बसताहेत दबा धरून
थंडीचे दिवस असल्याने वाहनधारक लवकरच घरात झोपून जातात, तर काही वाहनधारक या भुरट्या चोरांचा छडा लावण्यासाठी दबा धरून बसत आहेत. मात्र याची टोळीला चाहुल लागताच चोरटे त्या भागात फिरकतही नाही. यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची  मागणी जोर धरत आहे.

Web Title: The rise of petrol thieves in Varangaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.