भाजीपाला घेण्यासाठी गेले अन् चोरट्यांनी लांबविली रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 20:44 IST2021-03-08T20:44:23+5:302021-03-08T20:44:32+5:30

जळगाव : भाजीपाला घेण्यासाठी गेलेले गोपाल युवराज चौधरी (रा. असोदा, ह.मु. ज्ञानदेव नगर) यांची रिक्षा अज्ञात चोरट्यांनी भाजीपाला मार्केट ...

The rickshaw was taken away by the thieves who went to get the vegetables | भाजीपाला घेण्यासाठी गेले अन् चोरट्यांनी लांबविली रिक्षा

भाजीपाला घेण्यासाठी गेले अन् चोरट्यांनी लांबविली रिक्षा

जळगाव : भाजीपाला घेण्यासाठी गेलेले गोपाल युवराज चौधरी (रा. असोदा, ह.मु. ज्ञानदेव नगर) यांची रिक्षा अज्ञात चोरट्यांनी भाजीपाला मार्केट परिसरातील रोहिणी स्वीटमार्टजवळून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुना खेडी रस्त्यावरील ज्ञानदेवनगरात गोपाल चौधरी हे कुटुंबीयांसह वास्तव्यास असून ते रिक्षा (क्र.एमएच.१९.व्ही.३६८८) चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, शनिवारी पहाटे ५.३० वाजता ते अजिंठा चौफुलीजवळील भाजीपाला मार्केट येथे भाजीपाला घेण्यासाठी रिक्षाने आले होते. नंतर मार्केटच्या बाहेर असलेल्या रोहिणी स्वीट मार्टच्या बाजूला रिक्षा उभी करून भाजीपाला घेण्यासाठी निघून गेले. भाजीपाला घेऊन परतल्यानंतर त्यांना रिक्षा जागेवर मिळून आली नाही. आजू-बाजूच्या परिसरात रिक्षाचा शोध घेतला तरीदेखील मिळून आली नाही. अखेर एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन रिक्षा चोरीप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करत आहेत.

 

Web Title: The rickshaw was taken away by the thieves who went to get the vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.