शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जळगाव शहरात महामार्गावर रात्री ९.३० वाजता डंपरने उडविले रिक्षाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:59 IST

भरधाव डंपरने विरुध्द दिशेने जाऊन समोरुन येणा-या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालक बचावला आहे, तर रिक्षात बसलेला एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर दूधाच्या टॅँकरवर जाऊन धडकला.

ठळक मुद्देरिक्षा चालक बचावला चालक समजून डंपरमधील दुस-यालाच मारहाण दूधाच्या टॅँकरलाही धडक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२२   : भरधाव डंपरने विरुध्द दिशेने जाऊन समोरुन येणाºया रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालक बचावला आहे, तर रिक्षात बसलेला एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर दूधाच्या टॅँकरवर जाऊन धडकला. या अपघातानंतर चालकाने लागलीच पळ काढला तर क्लिनरच्या दिशेने बसलेल्या एका जणाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. हा अपघात मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपाजवळ झाला.

एक जण जखमीयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आसीफ जब्बार पटेल (रा.रामनगर, डी.मार्ट जवळ, जळगाव) या रिक्षा चालकाने पिंप्राळा परिसरात प्रवाशी सोडल्यानंतर घराकडे जात असताना गुजराल पेट्रोल पंपापासून हाकेच्या अंतरावर भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (क्र.एम.एच.०४ डी.के.६२०८) विरुध्द दिशेला जाऊन रिक्षाला (क्र.एम.एच.१९ व्ही.५९२७) जोरदार धडक दिली. त्यात नशिब बलवत्तर म्हणून रिक्षा चालकाला दुखापत झाली नाही, मात्र मागच्या सीटवर बसलेला मित्र सुनील नियामतखा तडवी याच्या पायाला दुखापत झाली. या अपघातात तडवी याचा मोबाईल व पैसे असलेले पाकीटही चोरी गेले.दूधाच्या टॅँकरलाही दिली धडकरिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर रस्त्याच्याकडेला थांबलेल्या दुधाच्या टॅँकरवर (क्र.एम.एच.१९ झेड.५०८०) धडकले. टॅँकरचे किरकोळ नुकसान झाले आहे. हा टॅँकर शहरात येत होता. चालक त्याच परिसरात राहत असल्याने त्याचा जेवणाचा डबा घरुन येत असल्यामुळे टॅँकर तेथे थांबविण्यात आला होता.चालक समजून दुस-यालाच मारहाणया अपघातामुळे संतप्त जमावाने चालक समजून शेजारी बसलेल्या कैलास दत्तू पाटील (रा.बांभोरी, ता.धरणगाव) याला मारहाणकेली. त्याच्या अंगावरील कपडेही फाटले होते. तर मार खाण्याच्या भीतीने चालकाने गर्दीतून पळ काढला. चालकाचे नाव भूषण असल्याचे कैलास याने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सोडून कैलास याला ताब्यात घेत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणले. सुनील भास्कर पाटील (रा.सावदे, ता.एरंडोल,ह.मु.जळगाव) यांच्या मालकीचे हे डंपर असल्याचे समजले.डंपरवरहीतसाउल्लेखआहे.रात्री९.३०वाजता वाहतुकीची कोंडीया अपघातामुळे दोन्ही बाजुंनी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सागर शिंपी हे सहकाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याशिवाय जिल्हा पेठ, रामानंद व पोलीस उपअधीक्षकांचे पथकही दाखल झाले. या कर्मचाºयांनी वाहतूक सुरळीत केली. नगरसेवक अमर जैन यांनीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. 

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा