रिक्षाचालकाने तरुणावर केला चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 20:01 IST2020-12-16T20:01:44+5:302020-12-16T20:01:54+5:30

जळगाव : रिक्षाचा कट का मारला याचा राग येऊन चालकाने जुबेर शेख भिकन शेख (वय १९) या तरुणाला मारहाण ...

The rickshaw puller attacked the youth with a knife | रिक्षाचालकाने तरुणावर केला चाकू हल्ला

रिक्षाचालकाने तरुणावर केला चाकू हल्ला

जळगाव : रिक्षाचा कट का मारला याचा राग येऊन चालकाने जुबेर शेख भिकन शेख (वय १९) या तरुणाला मारहाण करुन चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री ११.१५ वाजता गेंदालाल मिल परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षाचालक किशोर अहिरे याच्याविरुध्द बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेर शेख भिकन शेख हा मंगळवारी रात्री मित्र लक्ष्मण भदाणे आणि अल्ताफ खान यांच्यासोबत गेंदालाल मिल परिसरातील डॉ. सुरज पाटील यांच्या दवाखान्याजवळ उभा होता. त्यावेळी रिक्षाचालक किशोर अहिरे याने त्याला कट मारला. जुबेरने याचा जाब विचारल्याचा राग आल्याने किशोरने जुबेरला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर चाकुने त्याच्या डाव्या हाताचे मनगट व गळ्यावर वार केला. यात जुबेर जखमी झाल्यानंतर रिक्षाचालक किशोर पळून गेला. यानंतर मित्र व कुटुंबीयांनी जुबेर याला रुग्णालयात दाखल केले आहे. जुबेरच्या फिर्यादीवरुन किशोर अहिरे याच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The rickshaw puller attacked the youth with a knife