रिक्षाला टेम्पोची धडक: एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 21:43 IST2019-07-18T21:43:27+5:302019-07-18T21:43:58+5:30
पारोळा : ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने रिक्षाला मागूून जबर धडक दिली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण ...

रिक्षाला टेम्पोची धडक: एक ठार, दोन जखमी
पारोळा : ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने रिक्षाला मागूून जबर धडक दिली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना तालुक्यातील चोरवड रस्त्यावरील कामतवाडी फाट्याजवळ १८ जुलै रोजी पहाटे ३: ३० वाजता घडली.
गावातील समाधान धोंडू हाटकर, सुनील धोंडू हाटकर यांचे बंधू आजारी होते. त्यांना रुग्णालयात सोडून रिक्षाचालक (क्रमांक एमएच-१९-बीयू-७९०७) किरण शिवाजी पाटील (३२, रा. कामतवाडी) हे परत कामतवाडीकडे जात होते. रस्त्यावर कैरी भरून भरधाव वेगात व्होअरटेक करीत येणारा टेम्पो (एमएच-१९-सीवाय-३३१४) मागून किरण यांच्या रिक्षाला जोरात धडकला. त्यामुळे रिक्षातील किरण शिवाजी पाटील जागीच ठार झाले. तर समाधान हटकर व सुनील हटकर हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सुनील धोंडू हाटकर यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेम्पोचालक ज्ञानेश्वर बडगुजर (रा. पिंपळगाव हरे., ता.पाचोरा) पोलिसांच्या ताब्यात आहे. तपास हेडकॉन्स्टेबल रवींद्र राहते हे करीत आहेत.