जळगावात रिक्षा चालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 21:37 IST2019-08-21T21:36:10+5:302019-08-21T21:37:39+5:30
पिंप्राळा उपनगरातील मढी चौक परिसरात राहणारे आधार बुधा पाटील (५५) या रिक्षा चालकाने शाहू नगरातील जळकी मील भागात रेल्वे रुळाला लागून असलेल्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघड झाली. आधार पाटील यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नाही.

जळगावात रिक्षा चालकाची आत्महत्या
ref='https://www.lokmat.com/topics/jalgaon/'>जळगाव : पिंप्राळा उपनगरातील मढी चौक परिसरात राहणारे आधार बुधा पाटील (५५) या रिक्षा चालकाने शाहू नगरातील जळकी मील भागात रेल्वे रुळाला लागून असलेल्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघड झाली. आधार पाटील यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपासून ते घराच्या बाहेर होते. सायंकाळी पाच वाजता त्यांचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळून आला. तासाभराने पोलिसांनी त्यांचा मृतदेह पंचनामा करुन जिल्हा रुग्णालयात हलविला. जुनी रिक्षा विक्री करुन नवीन रिक्षा घेण्याचे त्यांचे नियोजन होते. पश्चात पत्नी माया, मुलगा निलेश, विवाहित मुलगी अश्विनी व अविवाहित मुलगी सविता असा परिवार आहे. जावाई काश्मिर येथे सैन्य दलात असून मुलगी काही दिवसापूर्वीच पतीकडे गेली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.