जळगावात चार चाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा कोसळली पुलाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:28 IST2018-08-06T21:25:30+5:302018-08-06T21:28:28+5:30
पाळधी येथून जळगाव शहरात येत असलेल्या रिक्षाला मागून येणाऱ्या चारचाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा पुलाखाली कोसळली. या अपघातात रिक्षा चालकासह पाच जण जखमी झाले आहेत.

जळगावात चार चाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा कोसळली पुलाखाली
जळगाव : पाळधी येथून जळगाव शहरात येत असलेल्या रिक्षाला मागून येणाऱ्या चारचाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा पुलाखाली कोसळली. या अपघातात रिक्षा चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. रिक्षाचा चक्काचूर झाला असून नशिब बलवत्तर म्हणून रिक्षातील प्रवाशी बालंबाल बचावले आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी अकरा वाजता शिव कॉलनी पुलाजवळ झाला.
जखमी झालेल्यांमध्ये कल्पनाबाई हरचंद भोई, कमलाबाई शांताराम पाटील, सरला लक्ष्मण खैरनार, संगीता मच्छींद्र पाटील (सर्व रा.पाळधी, ता.धरणगाव) व रिक्षा चालक दीपक सुनील पाटील ( रा.फुलपाट,ता.धरणगाव) यांचा समावेश आहे. चालकाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. या सर्व प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.