यावल येथे प्रधानमंत्री सन्मान योजनेची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 15:46 IST2019-06-02T15:45:02+5:302019-06-02T15:46:36+5:30
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांमधूून लाभ मिळालेल्या व न मिळालेल्या शेतकºयांचा एका बैठकीत आढावा घेण्यात आला.

यावल येथे प्रधानमंत्री सन्मान योजनेची आढावा बैठक
यावल, जि.जळगाव : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांमधूून लाभ मिळालेल्या व न मिळालेल्या शेतकºयांचा एका बैठकीत आढावा घेण्यात आला.
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी येथील तहसील कार्यालयात बैठक झाली. त्यात आढावा घेण्यात आला.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकºयाचे बँक खाते क्रमांक, आधार कार्ड हे गोळा करण्याच्या प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी सूचना केल्या.
कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी हे नोडल अधिकारी म्हणून राहतील. त्यांनी तत्काळ वंचित शेतकºयांचे अकाउंटबाबतची माहिती गोळा करून आपल्या वरिष्ठाकडे अहवाल सादर करावा, अशा सूचना प्रांताधिकाºयांनी बैठकीत दिल्या.
बैठकीस तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, कृषी अधिकारी उपस्थित होते.
रोहयो अंतर्गत जलसंधारण कामे
याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना रोहयो अंतर्गत गावागावात जास्तीत जास्त नांदेड पॅटर्ननुसार शोषखड्डे तयार करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना दिल्या आहेत. शोषखड्ड्यामुळे पाणी अडवा-पाणी जिरवा हा उद्देश सफल होणार आहे. डास निर्र्मूलनासही मदत होणार असल्याने या कामी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना दिल्या आहेत. प्रती खड्डा अडीच हजारांचे अनुदान असल्याचेही गटविकास अधिकारी सपकाळे यांनी सांगितले.
याप्रसंगी सपकाळे यांनी विहीर पुनर्भरणाची माहिती देताना सांगितले की, सुमारे २०० प्रस्ताव आले आहेत. पुनर्भरणाची २० कामे झाली आहेत. यासाठी शेतकºयांना १२ हजारांचे अनुदान मिळेल, असेही सांगितले.