जळगावात भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:41 IST2018-10-26T11:35:53+5:302018-10-26T11:41:00+5:30

टमाट्याच्या भावात ३०० रुपये प्रती क्विंटलने घट

Resolve due to lower prices of vegetables in Jalgaon | जळगावात भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने दिलासा

जळगावात भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने दिलासा

ठळक मुद्देकांदा, कारले, वांगे यांचे भाव कमी कांद्याचे भाव कमी होऊन ते १४५० रुपये प्रती क्विंटलवर

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टमाट्याच्या भावात ३०० रुपये प्रती क्विंटलने घट होऊन लाल टमाटे १५०० रुपये प्रती क्विंटलवरून १२०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भाव कमी झाले आहे.
एरव्ही हिवाळ््याच्या सुरुवातीपासून टमाट्याचे भाव कमी होत असतात. मात्र मध्यंतरी टमाट्याची आवक कमी होऊन गेल्या आठवड्यात केवळ २२ क्विंटल टमाट्याची आवक झाली होती. त्यामुळे भाव वाढ होऊन ते १५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले होते. मात्र या आठवड्यात टमाट्याचे भाव थेट ३०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात १७५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या कांद्याचे भाव कमी होऊन ते १४५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. भेंडीचे भाव ५०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते १५००, कारल्याचे भाव ३०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते १५०० रुपयांवर आले आहेत.

Web Title: Resolve due to lower prices of vegetables in Jalgaon