शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

स्वस्ताईने ग्राहकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 20:56 IST

डाळींची भाववाढ थांबण्यासह कांदे, वांगे तसेच इतरही भाजीपाल्यामध्ये घसरण

विजयकुमार सैतवालजळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेली डाळींची भाववाढ थांबण्यासह कांदे, वांगे तसेच इतरही भाजीपाल्यामध्ये घसरण होऊन आलेली स्वस्ताई ग्राहकांना दिलासा देणारी ठरत आहे.गेल्या तीन आठवड्यांपासून सतत सुरू असलेली भाववाढ ग्राहकांसाठी चिंता वाढवित होती. सोबतच भाज्यांचेही दर आवाक्यात नव्हते. मात्र आता या सर्व वस्तू आवाक्यात आल्या आहेत. डाळींच्या भावात या आठवड्यात ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटसह दर्जावरही परिणाम झाला आहे. त्यात डाळींसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या उडीद, मुगाला ऐन पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने त्यांचे उत्पादन कमी होऊन कडधान्याची आवक घटली व गेल्या तीन आठवड्यांपासून डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी येत होती. बाजारात एक तर आवक कमी व मागणी जास्त असल्याने सर्वच डाळींचे भाव वाढत गेले. तीन आठवड्यात भाव वाढ होत जाऊन उडीदाची डाळ ६९०० रुपये प्रती क्विंटल पोहचली होती. तसेच हरभरा डाळ ६६०० रुपये प्रती क्विंटल, तूरडाळ ७००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली होती. मात्र सलग भाववाढीमुळे या आठवड्यात मागणी तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे उडीदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे ६६०० रुपये प्रती असलेल्या हरभरा डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. तर तूरडाळ ७००० रुपये प्रती क्विंटलवरून ६००० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहेत. मुगाची डाळ मात्र ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे.नवीन उडीद-मूग आल्यानंतर या दिवसात नवीन डाळींचीही आवक होते. त्यामुळे जळगावातील दालमिलमधून मोठ्या प्रमाणात डाळी निर्यातही होतात. मात्र यंदा आवकच कमी असल्याने डाळींचे उत्पादनही २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. असे चित्र असताना भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.या सोबतच कांद्याची आवक दुपटीने वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे भाव निम्यापेक्षाही कमी होऊन जळगाव कृषी बाजार समितीमध्ये कांदा केवळ २ रुपये प्रती किलोने खरेदी केला जात आहे.या सोबतच भाजीपाल्याची आवक वाढून भावकमी झाले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत वांगाच्या भावात ४०० रुपये प्रती क्विंटलने घट होऊन वांगे ९०० रुपये प्रती क्विंटलवरून ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भावदेखील कमी झाले आहे.हिवाळ््याच्या सुरुवातीपासून तसे वांग्याची आवक वाढून कमी होत असतात. मात्र मध्यंतरी वांग्याची आवक कमी होऊन तीन आठवड्यांपूर्वी केवळ २२ क्विंटल वांग्याची आवक झाली होती. त्यामुळे भाव वाढ होऊन ते १२०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले होते. मात्र या आठवड्यात वांग्याची आवक वाढून गेल्या आठवडयात ९०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याच्या भावात थेट ४०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. भाव कोथिंबीरचेही भाव ५०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते २५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव