युवक व युवा संस्थांच्या सामाजिक कार्याची मागविली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 21:30 IST2020-10-08T21:30:05+5:302020-10-08T21:30:27+5:30

जळगाव - जिल्ह्यातील युवा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवांची व युवा संस्थांनी केलेल्या कार्याची माहिती आयुक्त, क्रीडा व युवक ...

Requested information on social work of youth and youth organizations | युवक व युवा संस्थांच्या सामाजिक कार्याची मागविली माहिती

युवक व युवा संस्थांच्या सामाजिक कार्याची मागविली माहिती

जळगाव - जिल्ह्यातील युवा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवांची व युवा संस्थांनी केलेल्या कार्याची माहिती आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मागविली आहे.

युवा व युवा संस्था यांनी युवा क्षेत्रातील लोकांशी निगडित केलेले कार्य, समाजोपयोगी कार्य, संकट उपयोगी केलेल्या उपाय योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ, कोरोना काळात फ्रंट वॉरियर्स म्हणून तसेच इतर मार्गांनी केलेले कार्य, आरोग्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्र, संगीत कार्यात मिळविलेला नावलौकीक आदिबाबतची माहिती आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर करावयची आहे.
जळगाव जिल्ह्यातील जे युवा व युवा संस्था वरीलप्रमाणे सामाजिक कार्य करीत असतील त्यांनी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती, सोबत युवा व युवा संस्थेचे संपूर्ण नाव व पत्ता, संपर्क नंबर, मागील पाच वर्षनिहाय केलेले ठळक / उल्लेखनीय कार्याची संक्षिप्त माहिती कोव्हिड -19 च्या बाबत केलेले उल्लेखनीय कार्य, शासनाच्या योजना राबविण्यामध्ये घेतलेला सहभाग आदींची मुद्देसुद माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे दिनांक 13 ऑक्टोंबर, 2020 पर्यंत सादर करावी. असे मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Web Title: Requested information on social work of youth and youth organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.