बाधितांचे अहवाल आले मृत्यूनंतर : १२ दिवसातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 12:07 PM2020-06-28T12:07:09+5:302020-06-28T12:07:19+5:30

आनंद सुरवाडे । जळगाव : कोरोना संशयितांचे अहवाल उशिरा येणे जिल्ह्यात कळीचा मुद्दा बनत आहे. गेल्या १२ दिवसात ३३ ...

Reports of victims came after death: condition within 12 days | बाधितांचे अहवाल आले मृत्यूनंतर : १२ दिवसातील स्थिती

बाधितांचे अहवाल आले मृत्यूनंतर : १२ दिवसातील स्थिती

Next

आनंद सुरवाडे ।
जळगाव : कोरोना संशयितांचे अहवाल उशिरा येणे जिल्ह्यात कळीचा मुद्दा बनत आहे. गेल्या १२ दिवसात ३३ बाधितांचे अहवाल हे मृत्यूनंतर प्राप्त झाले आहेत. उशिरा करण्यात आलेल्या नोंदीवरून ही बाब समोर आली आहे़ यात २९ मे रोजी चोपडा तालुक्यातील एका ४५ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला होता़ १६ जून रोजी या मृत्यूची नोंद बाधितांच्या मृत्यूमध्ये करण्यात आली आहे़ यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़
जळगावात गेल्या १२ दिवसात ५५ जणांचे मृत्यू झालेले आहेत़ अशातच जळगावातील मृत्यूदर गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत आला आहे़ गेल्या काही दिवसांपासून एक वेगळाच प्रकार समोर आला असून मृत्यू झाल्यानंतर अनेक बाधितांची चार ते पाच दिवसांनी नोंद केली जात आहे़ मृत्यूनंतर अहवाल येत असल्याने त्यांची नोंद उशिरा होत असल्याचे अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांचे म्हणणे आहे़


एकही मृत्यू नाही़़़़
४१३ व २३ जून रोजी एकही मृत्यू झालेला नसताना संख्या मात्र प्रत्येकी ३ नोंदविण्यात आली होती़ १०, ११ व १२ जून रोजी झालेल्या मृत्यूची नोंद १३ जूनला झाली आहे तर २३ जून रोजी १९ आणि २२ जूनच्या प्रत्येकी १ व २० जूनच्या दोन मृत्यृची नोंद करण्यात आली आहे़ मृत्यू नसतानाही त्या दिवशी ६ मृत्यूची नोंद झाली आहे.

१३ जून रोजी मृत्यू झालेल्या जळगावातील एका ५५ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद १९ जून रोजी तर १३ रोजीच मृत्यू झालेल्या धरणगाव तालुक्यातील ५८ वर्षीय प्रौढाच्या मृत्यूची नोंद २१ जून रोजी झाली ़

Web Title: Reports of victims came after death: condition within 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.