खड्ड्यांची तक्रार पंतप्रधानांच्या पोर्टलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:57 IST2019-11-22T22:56:38+5:302019-11-22T22:57:10+5:30
जळगाव : अमृत योजनेमुळे निर्माण झालेल्या खड्डयांचा समस्येमुळे जळगावकर त्रस्त असून याबाबत शहरातील उद्योजक जतीन ओझा यांनी पंतप्रधान नरेंद्र ...

खड्ड्यांची तक्रार पंतप्रधानांच्या पोर्टलवर
जळगाव : अमृत योजनेमुळे निर्माण झालेल्या खड्डयांचा समस्येमुळे जळगावकर त्रस्त असून याबाबत शहरातील उद्योजक जतीन ओझा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या पोर्टलवर तक्रार केली आहे.
दरम्यान, या तक्रारीची नोंदणी पंतप्रधान कार्यालयाने देखील केली आहे. याबाबत नागरिकांनी या पोर्टलवर तक्रार करावी असे आवाहन देखील ओझा यांनी केले आहे.
अमृत योजनेसाठी दोन वर्षाचा वेळ होता. तो आता पूर्ण झाला आहे. यात फक्त ४० टक्के काम झाले आहे. शहरात खड्डे कायम आहेत आणि सर्वत्र धूळच धूळ झाली आहे. त्यामुळे शहरवासीय मोठ्या प्रमाणात त्रस्त असून त्या बाबत अनस्था दिसून येत आहे. त्यामुळे अखेरीस ओझा यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या पोर्टलवर तक्रार केली आहे.