पाचोऱ्यात २१०० किलो रांगोळीतून ‘आदिशक्ती’ ची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:08 IST2018-10-12T22:07:05+5:302018-10-12T22:08:58+5:30

पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवा निमित्त आदिशक्ती देवीची भव्य रांगोळीची कलाकृती आशीर्वाद हॉलमध्ये साकारण्यात आली.

A replica of 'Adishakti' from 2100 kg rangoli | पाचोऱ्यात २१०० किलो रांगोळीतून ‘आदिशक्ती’ ची प्रतिकृती

पाचोऱ्यात २१०० किलो रांगोळीतून ‘आदिशक्ती’ ची प्रतिकृती

ठळक मुद्देशिवसेना महिला आघाडीचा पुढाकार९० फुट उंच व ४५ फुट रुंद अशी प्रतिकृतीनवरात्रोत्सवात रांगोळी पाहण्यासाठी खुली

पाचोरा : पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवा निमित्त आदिशक्ती देवीची भव्य रांगोळीची कलाकृती आशीर्वाद हॉलमध्ये साकारण्यात आली. २१०० किलो रांगोळीचा वापर करीत ९० फुट उंच व ४५ फुट रुंद अशी प्रतिकृती साकारण्यात आली.
नवरात्रोत्सवात पाचोरा शिवसेना महिला आघाडीने पहिल्यांदाच सहभाग घेतला आहे. काहीतरी आगळे वेगळे करण्याचा संकल्प करीत शिवसेना आघाडीच्या महिलांनी स्थानिक रांगोळी कलाकारांच्या सहकार्यातून भडगांव रोड वरील आशिर्वाद हॉलमध्ये हा उपक्रम राबविला. ही कलाकृती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भक्तांना आवाहन केले आहे. रांगोळी कलाकार राहुल पाटील, जितेंद्र काळे, सुबोध कांतायन प्रा. निरंजन शेलार, करण पवार परिश्रम घेतले

Web Title: A replica of 'Adishakti' from 2100 kg rangoli