शिंदाड येथे श्री सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:11+5:302021-07-27T04:18:11+5:30
महादेवाच्या पिंडीची गावातून सजवलेल्या ट्रॅक्टरवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलाभगिनींनी वेशभूषेत भगवान शंकराच्या जयघोषात भक्तिभावाने मिरवणुकीत सहभाग घेतला. ...

शिंदाड येथे श्री सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार
महादेवाच्या पिंडीची गावातून सजवलेल्या ट्रॅक्टरवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलाभगिनींनी वेशभूषेत भगवान शंकराच्या जयघोषात भक्तिभावाने मिरवणुकीत सहभाग घेतला. १५ जोडप्यांच्या हस्ते गेले तीन दिवस होम हवन यज्ञ, महारुद्र प्राणप्रतिष्ठा विधीचे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित प्रशांत गव्हाले, विनायक जोशी, अरुण गव्हाले, भाऊसाहेब गव्हाले, किशोर व्यवहारे, नाना गव्हाले यांनी मंत्रोच्चाराने गावात वातावरण प्रसन्न केले. दि २५ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा सांगता होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला. रात्री कीर्तन, भजन कार्यक्रम झाले.
यावेळी आमदार किशोर पाटील, डॉ. भूषण मगर पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. खासदार उन्मेष पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे पाटील यांनी त्यांच्या फंडातून १४ लाखांचे सभामंडप मंजूर केले.