बारी समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 03:43 PM2019-02-03T15:43:37+5:302019-02-03T15:46:10+5:30

बारी समाज जरी ओबीसीमध्ये गणला जात असला तरी आजही इतर समाजांच्या तुलनेत बारी समाज मागे आहे. त्यामुळे बारी समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाला अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देणे गरजेचे असून, यासाठी विधानसभेत  प्रस्ताव मांडणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी समस्त बारी समाजबांधवांना दिले.

Regarding the Bari community as a minority community | बारी समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या

बारी समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या

Next
ठळक मुद्देमाजी मंत्री एकनाथराव खडसे बारी समाजाच्या १०० व्या अधिवेशानात देशभरातून एकत्र झाले समाज बांधवरुपलालजी महाराज यांना राष्टसंताचा दर्जा द्या 

 

जळगाव - बारी समाज जरी ओबीसीमध्ये गणला जात असला तरी आजही इतर समाजांच्या तुलनेत बारी समाज मागे आहे. त्यामुळे बारी समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाला अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देणे गरजेचे असून, यासाठी विधानसभेत  प्रस्ताव मांडणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी समस्त बारी समाजबांधवांना दिले.

रविवारी शहरातील शिरसोली रस्त्यावर सकल बारी समाज विकास परिषदेतर्फे अखिल भारतीय बारी समाजाच्या १०० व्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री रामदास बोडके, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी, नाळ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे, बारी समाजाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अनुप बारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुपलालजी महाराज यांना राष्टÑसंताचा दर्जा द्या 
१. एकनाथराव खडसे म्हणाले , बारी समाज संपूर्ण भारतात अनेक पोटजातींमध्ये विखुरला आहे. या समाजाचे देशासाठी मोठे योगदान आहे. तसेच रुपलालजी महाराज यांनी देखील समाजासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले असून, शासनाने रुपलालजी महाराज यांना राष्टÑसंताचा दर्जा देण्याची गरज आहे. यासाठी विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात येईल. तसेच मुख्यमंत्र्यांसह शासनाच्या कोणत्याही मंत्र्यांशी याबाबत बोलून निर्णय घेण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली. 
२. बारी समाज देशभरात बरई, तांबोळी, चौरसिया, कुमरावत अशा पोटजातींमध्ये विखुरला आहे. समाज जरी मोठा असला तरी अजून देखील समाज एकत्र झालेला नाही. त्यामुळे समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच पोटजातींमध्ये ‘रोटी-बेटी’ व्यवहार देखील व्हावा यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा असेही एकनाथराव खडसे म्हणाले. 

‘एक बारी, सब पे भारी’ 
बारी समाजाने प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली असून, ‘एक बारी, सब पे भारी’ हे वाक्य सार्थ ठरवले असल्याचेही खडसे यांनी सांगितले. समाजातील युवक देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवत असून, समाजातील मुलींनी देखील आता पुढे येण्याची गरज असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अधिवेशनाचे कार्याध्यक्ष मनोज बारी यांनी केले. 

Web Title: Regarding the Bari community as a minority community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.