पारोळा लोकदालतीत ४१ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:34 IST2019-09-15T23:34:51+5:302019-09-15T23:34:57+5:30
२२ लाखांची वसुली : अनेक जोडप्यांचे मिलन

पारोळा लोकदालतीत ४१ प्रकरणे निकाली
पारोळा : येथील न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ रोजी राष्ट्रीय लोकदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रलंबित, वादपूर्व व दिवाणी, फौजदारी अशी एकूण ५०७ प्रकरणे सादर झाली. त्यातून ४१ प्रकरणे निकाली काढून सुमारे २१ लाख ८३ हजार १२९ रुपयांची वसुली करण्यात आली.
न्यायधीश पी.जी.महाळंकर, न्या.एम.के.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज पार पडले. तर पॅनल पंच म्हणून अॅड.सत्यवान निकम व अॅड.स्वाती शिंदे यांनी काम पाहिले. अॅड.अनिलकुमार देशपांडे, अॅड.ए.आर बागुल, अॅड.भूषण माने, अॅड.ए.डी.पाटील, सरकारी अभियोक्ता रमाकांत पाटील, प्रतिभा मगर, अतुल मोरे, विलास पाटील, वेदव्रत काटे, अध्यक्ष सतीश पाटील, सचिव गणेश मरसाडे, सचिन पाटील, अकील पिंजारी, प्रशांत ठाकरे, डी.एल.महाजन आदी उपस्थित होते.
वादपूर्व प्रकरणात ४२० पैकी २३ प्रकरणे निकाली काढून २० लाख ४६ हजार ११७ रुपये तडजोड रक्कम वसूली केली. दिवाणी प्रकरणात १० प्रकरणे निकाली काढून ४४ हजार वसुली केली. फौजदारी प्रकरणात २२ पैकी ८ प्रकरणे निकाली काढूून ९३ हजार दंड वसूल केला. लघुलेखक ए.एस.राणे, आर.एम.मुकुंद आदींनी परिश्रम घेतले.